शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन समस्येवर ‘फुटपाथ प्रदर्शन’

By admin | Updated: July 28, 2015 03:14 IST

विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे.

मुंबई : विदर्भातील सिंचन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनमंच संघटनेने ‘फुटपाथ प्रदर्शन’ या अनोख्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाद्वारे संघटना लोकांमध्ये जनजागृती आणून विदर्भ सिंचन महामंडळावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किनोर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत उपक्रमाविषयी माहिती दिली. किनोर म्हणाले, की विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे, हा उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. जनमंचसोबत वेद आणि नागपूरमधील इतर सामाजिक संघटना या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या संघटनांनी एकत्र येत ‘सिंचन शोधयात्रा’ हा कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत विदर्भातील सात महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. शिवाय प्रकल्पातील नेमक्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रकल्पाची सद्य:स्थिती, निकृष्ट आणि अर्धवट कामे अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडला. विदर्भ सिंचन महामंडळाने न्यायालयात खोटी माहिती दिल्याचेही निदर्शनास आले. परिणामी ही सर्व माहिती छायाचित्रांच्या रूपात फुटपाथ प्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जनमंच करणार आहे. या माध्यमातून सरकारचेही लक्ष वेधण्याचा संघटनेचा मानस आहे. याआधी सिंचन घोटाळ््यातील पुरावे म्हणून सहा हजार कागदपत्रे संघटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले आहेत. मात्र एसीबीने एकाही अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती किनोर यांनी दिली.विदर्भातील गोसेखुर्दचा उजवा कालवा, डावा कालवा, पिंपळगाव वखाजी, कार, तुरागोंदी, लोअर वर्धा, सत्रापूर, आणि अंभोरा या सात प्रकल्पांना जनमंचच्या कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. त्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन मंगळवारी, २८ जुलै रोजी सीएसटी येथील आझाद मैदानावर दुपारी १२ ते ४ दरम्यान भरणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले करणार आहे.