शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये प्रवेशासाठी पास

By admin | Updated: August 29, 2014 01:04 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आता एका रुग्णासोबत दोनच नातेवाईकांना आत जाता येईल, तर वॉर्डात रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला राहता येईल. यासाठी ‘पासेस सिस्टीम’

नवीन प्रणाली लागू : रुग्णासोबत एकच नातेवाईकनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आता एका रुग्णासोबत दोनच नातेवाईकांना आत जाता येईल, तर वॉर्डात रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला राहता येईल. यासाठी ‘पासेस सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या हस्ते झाले.मेडिकलमध्ये १२०० वर रुग्ण भरती असतात. यात एका रुग्णासोबत दोनपेक्षा जास्त नातेवाईक असतात. साधारण चार हजाराच्यावर रुग्णांचा राबता रुग्णालयात असतो. यामुळे उपचारापासून ते सफाईच्या कामापर्यंत अनेक अडचणी निर्माण होतात. यातच रुग्णालयात मनुष्यबळाची संख्या कमी आहे. समस्यांचे निराकरण होण्यापेक्षा त्या वाढतच होत्या. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे यांनी ‘पास सिस्टीम’ सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. याला अधिष्ठाता डॉ. पोवार यांनी लागलीच मान्यता दिली. आज सकाळी गेट क्रमांक १ येथे या प्रणालीचे उद्घाटन झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पोवार यांच्यासोबत नगरसेवक गुड्डू तिवारी, डॉ. आर.पी सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, डॉ. नरेंद्र तिरपुडे, ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अपूर्व पावडे, डॉ. सुभाष ठाकरे, डॉ. मरारी सिंग आदी उपस्थित होते.अशी असणार प्रणालीडॉ. ठाकरे यांनी सांगितले, रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांना पासेस वितरित करण्यात आल्या आहेत. नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांना रजिस्ट्रेशन करताना पास देण्यात येईल. पासेसवर रुग्णाचे नाव, तारीख, वेळ नमूद करण्यात येणार आहे. यामुळे नातेवाईकांचाच रुग्णालयात प्रवेश राहील. सोबतच पासेसला मुदत देण्यात आली आहे. त्यात वाढ करण्यासाठी परिचारिकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. एका पासवर दोन नातेवाईकांना सोडण्यात येईल. यातही एक वॉर्डात तर दुसरा प्रतिक्षालयात राहील. दुपारी ४ ते ७ वाजता ही रुग्णांना भेटण्याची वेळ आहे. यावेळेत एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाला पास हस्तांतरण करेल. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयाचे अनेक सर्वच छोटे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. फक्त दोन प्रवेशद्वारावरून नातेवाईकांना रुग्णालयाच्या आत सोडण्यात येईल. या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असणार आहे. ते पासेसची तपासणी करूनच आत सोडतील. (प्रतिनिधी)