शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना सेवा पोलादी एसटीतून

By admin | Updated: August 24, 2016 05:50 IST

एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

मुंबई : ‘एसटीचा प्रवास, विना अपघात प्रवास’ असे घोषवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी महामंडळाने बसच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व बसेसच्या बांधणीसाठी पोलादाचा वापर केला जाईल. एसटीच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बसेस असून, त्यांची बांधणी ही अ‍ॅल्युमिनियमने करण्यात आली आहे. या बसेसचे आयुर्मान हे साधारणपणे आठ वर्षांचे असते. एसटी बसचा अपघात झाल्यास अ‍ॅल्युमिनियम बांधणीच्या असलेल्या बसेस जीवितहानी टाळण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे बस स्टीलने बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सध्या एका बसमध्ये असा प्रयोग करण्यात आला आणि त्याची कार्यशाळेत चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली. त्यामुळे एसटीच्या सुरुवातीला ५00 बसेसची संपूर्ण बाह्य बांधणी ही पोलादाने केली जाईल. या सर्व बसेस अन्य कारखान्यातून बांधून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी कंत्राट पद्धतीने काम दिले जाईल. त्यावर एसटीच्या तंत्रज्ञांकडूनही लक्ष दिले जाणार आहे. बसच्या आकारातही बदल करतानाच, त्यांची उंची वाढविण्यावरही भर दिला जात असल्याचे देओल म्हणाले. (प्रतिनिधी)>राज्यात मोठ्या प्रमाणात एसटी बसचे अपघात होताना दिसतात. २0१२-१३ ते २0१४-१५ सालापर्यंत दर लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण हे 0.१५ टक्के एवढे होते. हेच प्रमाण 0.१४ टक्क्यांवर आले आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. २0१५-१६शी तुलना करता या वर्षात ४0७ जण दगावले असून, ते प्रमाण बरेचसे कमी आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटीच्या अपघातात दगावतात. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे.