शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साडेपाच हजारांवर कैद्यांना पॅरोल, फर्लोचा दे धक्का

By admin | Updated: October 12, 2016 20:28 IST

दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या

- सचिन राऊत/ ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 12 - दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील कारागृहात असलेल्या साडे पाच हजारांवर कैद्यांना याचा फटका बसला आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना मुलगा-मुलीचा विवाह, जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू यासारख्या कारणांमुळे कैद्यांना पॅरोल आणि फर्लो या रजा मंजूर करण्यात येतात; मात्र या कैद्यांना पॅरोल व फर्लो दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांतील कैदी कारागृहात परत आलेच नसल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. अकोल्यात गत सहा महिन्यांत अशा प्रकारची पाच प्रकरणे उघडकीस आली असून, हे कैदी अमरावती आणि नागपूर कारागृहातून सुटी घेतल्यानंतर परतच गेले नव्हते, त्यामुळे कैद्यांना दिल्या जाणाऱ्या या सुट्ट्यांबाबत सरकारने धोरण आणखी कडक केले आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसविण्यासाठी बलात्कार, खून, दरोडा, लहान मुलांचे अपहरण, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी व दहशतवादी कृत्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच हजार ८०० कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुटी मिळणार नाही. राज्यातील कारागृहात खून प्रकरणात ५ हजार २०० कैदी शिक्षा भोगत असून, बलात्काराच्या गुन्ह्यांत २३६, दरोड्याच्या गुन्ह्यांत १२३ आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत ८४ कैदी शिक्षा भोगत आहेत. यासोबतच दहशतवादी कृत्य व लहान मुलांच्या अपहरणात सुमारे पन्नास कैदी शिक्षा भोगत आहेत.