शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदी तुडुंब ! कोल्हापूर, सांगली, पंढरपूरला पूरस्थिती; अहिल्यानगर-दौंड वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:53 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या पूरामुळे रत्नागिरी महामार्ग ठप्प झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर/अहिल्यानगर/सोलापूर : पंचगंगा आणि कृष्णेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली शहरातील पूरस्थिती गंभीर झाली असून, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शहरात व शेतात घुसले आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. इकडे भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सिद्धटेक (जि. अहिल्यानगर) ते दौंड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. भीमा नदीत सुमारे पावणेदोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

उजनी धरणातून सायंकाळी ६ वाजता १ लाख ५१ हजार ६०० क्युसेक, तर वीर धरणातील विसर्ग कमी करून १५ हजार ३२४ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धरणातून १ लाख ६७ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात १ लाख ४६ हजार क्युसेकचा, तर संगम येथे १ लाख ९५ हजारांचा विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात रात्री विसर्ग वाढल्याने व्यासनारायण बरोबर अंबाबाई पटांगणनगर झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. प्रशासनाने १३७ संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थलांतर केले असून, आणखी १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

पंचगंगा धोक्याच्या वर

पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून, सध्या ४३.०५ फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा व कोल्हापूर ते रत्नागिरी हे तळकोकणाला जोडणाऱ्या दोन्ही मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. कोयना धरणात २४ तासांत सुमारे साडेसहा 3 टीएमसी पाणी आवक झाली. त्यातच आवक कमी झाल्याने कोयनेचे सहा दरवाजे १३ वरून ११ फुटांपर्यंत खाली घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे ४३ फूट झाली आहे. भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने सिद्धटेक-दौड संपर्क तुटला आहे.

टॅग्स :floodपूर