प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळ ...
एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्य ...
गोंदिया शहरात चार ते पाच ठिकाणी क्वारंटाईन आणि कोविड केअर स्थापन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.१२) सायंकाळी गोंदिया फुलचूर येथील तंत्रनिकेत विद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांना शिळे व निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. त्यामुळे येथील नाग ...
सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जात ...
बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ...
जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच् ...
वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात ...
मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरुन असलेल्या विलासने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने ठेचून कैलासची निर्घृण हत्या केली. चेहरा ठेचल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या कैलासला पाहून विलासच्या पत् ...
या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून हो ...
सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना ...