वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:19+5:30

या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून होतो. या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला डास, चावणाऱ्या माशा तसेच गोचिड यांच्या माध्यमातून होतो.

New crisis on livestock in Wani, Maregaon | वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट

वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट

Next
ठळक मुद्देलंपी स्कीन डिसिजची लागण : चंद्रपूरमार्गे यवतमाळ जिल्ह्यात झाला शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी/मारेगाव : चंद्रपूरमार्गे यवतमाळ जिल्ह्यात शिरकाव झालेल्या ‘लंपी स्कीन डिसिज’ची वणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील पशुधनांना लागण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून होतो. या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला डास, चावणाऱ्या माशा तसेच गोचिड यांच्या माध्यमातून होतो. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. आजाराने बाधित झालेल्या जनावरांना डोके, मान, पोट, पाठ तसेच पाय, शेपटी आणि त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. काही दिवसानंतर त्यातून पस येण्याची शक्यता असते. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्येदेखिल गाठी आढळून येतात. गं्रथीला सुज येणे, पुढील व मागील पायांवर सुज असणे, अशी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. या आजारात ताप येतो. डोळे, नाकातून स्त्राव गळतो.

गोठ्याची स्वच्छता गरजेची
या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुधन पालकांनी गोठ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या पशुधनाला या आजाराची बाधा लवकर होते. ज्या पशुधनाला या आजाराची बाधा झाली, त्याचे विलगीकरण करणे गरजेचे असते, अशी माहिती वणीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.मंदार मराठे यांनी दिली.

Web Title: New crisis on livestock in Wani, Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य