शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीची चौकशी

By admin | Updated: February 3, 2015 01:29 IST

शनिवारी रात्री ओझर विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरू झाली आहे.

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीसाठी शनिवारी रात्री ओझर विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौकशी सुरू झाली आहे. मद्यसेवनासाठी उत्पादन शुल्क विभागाचा एक दिवसाचा परवाना घेतल्याचेही उघड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी फडणवीस यांच्याकडे पार्टीविरोधात तक्रार केली होती. बांधकाम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेतल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिल्याचे समजते. संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील विमानतळावरील जागेत सेवानिवृत्ताचा कार्यक्रम, तोही मद्यपान व संगीताच्या तालावर कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुळातच उत्पादन शुल्क विभागाने मद्यसेवनाचा परवाना थेट ओझर विमानतळाच्या नावाने दिलेला असल्याने हे परवानगीचे पत्र वादात सापडण्याची चिन्हे आहेत. हर्ष कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत विलास बिरारी यांनी ३१ तारखेचा एक दिवसाचा मद्यसेवनाचा परवाना काढला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनीही शासकीय जागेत दारू पिण्याचा परवाना देता येतो काय, याबाबत आपण वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविणार असल्याचे सांगितले. मोहिते यांनी शासकीय जागेवर मद्यसेवन झाले व त्यासाठी परवानगीही घेतल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले. कार्यक्रमात डीजे वाजविण्याची परवानगी घेतली होती काय, डीजे कुठला होता, ग्रामस्थ व या कार्यक्रमाच्या आयोजकांत वाद झाले आहेत काय, त्याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)