शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो !

By admin | Updated: September 9, 2014 04:48 IST

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्‍चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे.

अकोला : दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्‍चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे. गत दोन दिवसापासून विदर्भात सर्वदूर पाऊस सुरू असून, नदी, नाले, ओढय़ांना पूर आला आहे. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांना या पावसाने दिलासा दिला असून, बुलडाणा जिल्हय़ातील दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. याच जिल्हय़ातील मस धरण १00 टक्के भरले असून, या धरणातून १0 से.मी. सांडवा वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेकंद ५.७३ दलघमी असून, कोराडी धरणातून २५ सेमी सांडवा वाहत आहे. त्यामुळे या धरणातून प्रतिसेंकद ३४.५६ दलघमी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. अकोला जिल्हयातील काटेपूर्णा धरणाचा उपयुक्त जलसाठा २६.६१ दलघमी असून, या धरणाचा एकूण जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहाचला आहे. या धरणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात उपयुक्त जलसाठा २0.0६ दलघमी असून, या जलसाठय़ाची टक्केवारी ४८ आहे. याच तालुक्यातील निगरुणा धरणाचा जलसाठा ९८ टक्कय़ांवर पोहोचला आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील उमा धरणाचा जलसाठा मात्र १९ टक्केच असून, दगडपारवा धरण अद्यापही शून्यावर आहे. आकोट तालुक्यातील पोपटखेड लघू पाटंबधारे प्रकल्पाचे दोन वक्रव्दार ५ सेमीने उघडण्यात आले आहेत.