शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

देशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 04:33 IST

देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांतील एक लाख कामगार खासगीकरणाविरोधात एकवटले असून ते मंगळवारपासून संपावर गेले आहेत.

पुणे/ अंबरनाथ : देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांतील एक लाख कामगार खासगीकरणाविरोधात एकवटले असून ते मंगळवारपासून संपावर गेले आहेत.सरकार आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. यामुळे या कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळेल असा आरोप करीत राष्ट्रीय महासंघ, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन , इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, सीडीआरए या संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे.तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले तसेच सर्व केंद्र्रशासित पोलीस दलांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरवण्याचे काम या कारखान्यांमार्फत करण्यात येते.या संपामध्ये केवळ कामगारच नाही तर अन्य कर्मचारी तसेच गट ब आणि अधिकारीही सहभागी झाले आहेत. संयुक्त संघर्ष समितीने घेतलेल्या निर्णयानुसार २० सप्टेंबरपर्यंत सर्व कारखाने बंद राहणार आहेत.अंबरनाथमध्ये पहिल्या दिवशीच कामगार संघटनांनी संप यशस्वी केला. अंबरनाथमधील दोन्ही कारखान्यांचे मिळून ३ हजार कामगार संपात सहभागी झाले आहेत. कामसार संघटनांच्या प्रतिनिधींनी चारही प्रवेशद्वारांवर निदर्शने केली. कामगार संघटनांच्या एकजुटीमुळे पहिला दिवस यशस्वी झाला आहे. मात्र हा संप महिनाभर असल्याने संघटनेची कसोटी पणाला लागली आहे.कामगार संघटनांच्या या संपाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि इंटक युनियनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी संघटनांना मार्गदर्शन करत आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे काम संघटनेमार्फत नक्कीच केले जाईल असे मत व्यक्त केले.राज्यातील ५० हजार कर्मचारीराज्यात १० दारूगोळा कारखाने आहेत. त्यात पुण्यात ३, अंबरनाथ (मुंबई) येथे २, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वरणगाव आणि भुसावळ येथे प्रत्येकी १ आयुध निर्माण करणारे कारखाने आहेत. जवळपास ५० हजार कर्मचारी या कारखान्यांमध्ये काम करतात.पहाटेपासून पदाधिकारी कंपनीच्या गेटवरकामगारांचा संप यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी पहाटे चारपासून कंपनीच्या गेटवर उभे होते. कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन केले जात होते. अनेक कामगारांनी स्वत:हून कामावर न येता संपात सहभाग घेतला. कारखान्यातील महिला कामगारही संपावर गेल्या आहेत. कामगारांनी पहिल्या दिवशी संपात सहभाग घेतला असून हा सहभाग कायम ठेवण्याची धडपड सुरू केली आहे. या संपासाठी कामगार संघटनेचे किसन गायकर, दिनेश कंठे, राजू खराडे आणि जितेंद्र उबाळे आणि त्यांचे सर्व सहकारी एकत्रित काम करत आहेत.

टॅग्स :Strikeसंप