देशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:33 AM2019-08-21T04:33:24+5:302019-08-21T04:33:49+5:30

देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांतील एक लाख कामगार खासगीकरणाविरोधात एकवटले असून ते मंगळवारपासून संपावर गेले आहेत.

Over one lakh employees of ammunition factories in the country | देशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर

देशातील दारूगोळा कारखान्यांचे एक लाख कर्मचारी संपावर

Next

पुणे/ अंबरनाथ : देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांतील एक लाख कामगार खासगीकरणाविरोधात एकवटले असून ते मंगळवारपासून संपावर गेले आहेत.
सरकार आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. यामुळे या कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळेल असा आरोप करीत राष्ट्रीय महासंघ, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन , इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, सीडीआरए या संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे.
तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले तसेच सर्व केंद्र्रशासित पोलीस दलांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरवण्याचे काम या कारखान्यांमार्फत करण्यात येते.
या संपामध्ये केवळ कामगारच नाही तर अन्य कर्मचारी तसेच गट ब आणि अधिकारीही सहभागी झाले आहेत. संयुक्त संघर्ष समितीने घेतलेल्या निर्णयानुसार २० सप्टेंबरपर्यंत सर्व कारखाने बंद राहणार आहेत.
अंबरनाथमध्ये पहिल्या दिवशीच कामगार संघटनांनी संप यशस्वी केला. अंबरनाथमधील दोन्ही कारखान्यांचे मिळून ३ हजार कामगार संपात सहभागी झाले आहेत. कामसार संघटनांच्या प्रतिनिधींनी चारही प्रवेशद्वारांवर निदर्शने केली. कामगार संघटनांच्या एकजुटीमुळे पहिला दिवस यशस्वी झाला आहे. मात्र हा संप महिनाभर असल्याने संघटनेची कसोटी पणाला लागली आहे.
कामगार संघटनांच्या या संपाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि इंटक युनियनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी संघटनांना मार्गदर्शन करत आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे काम संघटनेमार्फत नक्कीच केले जाईल असे मत व्यक्त केले.

राज्यातील ५० हजार कर्मचारी
राज्यात १० दारूगोळा कारखाने आहेत. त्यात पुण्यात ३, अंबरनाथ (मुंबई) येथे २, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वरणगाव आणि भुसावळ येथे प्रत्येकी १ आयुध निर्माण करणारे कारखाने आहेत. जवळपास ५० हजार कर्मचारी या कारखान्यांमध्ये काम करतात.

पहाटेपासून पदाधिकारी कंपनीच्या गेटवर
कामगारांचा संप यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी पहाटे चारपासून कंपनीच्या गेटवर उभे होते. कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन केले जात होते. अनेक कामगारांनी स्वत:हून कामावर न येता संपात सहभाग घेतला. कारखान्यातील महिला कामगारही संपावर गेल्या आहेत. कामगारांनी पहिल्या दिवशी संपात सहभाग घेतला असून हा सहभाग कायम ठेवण्याची धडपड सुरू केली आहे. या संपासाठी कामगार संघटनेचे किसन गायकर, दिनेश कंठे, राजू खराडे आणि जितेंद्र उबाळे आणि त्यांचे सर्व सहकारी एकत्रित काम करत आहेत.

Web Title: Over one lakh employees of ammunition factories in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप