शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत ३४.३४ लाख अनधिकृत, विनातिकीट प्रवासी; मध्य रेल्वेकडून २०३.७६ कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:04 IST

Central Railway News: मध्य रेल्वे प्रवाशांना बनावट तिकिटे तयार करणे/मिळविणे आणि त्यावर प्रवास करण्याऱ्या फसव्या मार्गांचा वापर करू नये असे आवाहन करते.

Central Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या अढळ वचनबद्धतेनुसार नेटवर्कमध्ये अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. योग्य आणि पद्धतशीर तिकीट तपासणी मोहिमेद्वारे, मध्य रेल्वेने २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) या आर्थिक वर्षात लक्षणीय परिणाम मिळवले आहेत.

मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) दरम्यान अनुचित किंवा अवैध प्रवास करणाऱ्या ३४.३४ लाख प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ३१.२८ लाख प्रवाशांच्या तुलनेत जवळपास ९.८ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) काळात दंड म्हणून २०३.७६ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत याच कालावधीत वसूल करण्यात आलेल्या १६७.६१ कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत २१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

३.४२ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी अवैध प्रवास करणाऱ्या ३.५८ लाख प्रवाशांवर कारवाई केली. तर जानेवारी-२०२५ मध्ये ही संख्या ३.२७ लाख होती, जी जवळपास ९.५ टक्के वाढ दर्शवते. जानेवारी-२०२६ या महिन्यात उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड म्हणून २०.६० कोटी वसूल करण्यात आले आहेत, जे जानेवारी-२०२५ मध्ये १५.६२ कोटी रुपये होते, ज्यातून जवळपास ३२ टक्के वाढ दर्शवते. उपनगरीय रेल्वेत अनधिकृत प्रवास कमी करण्यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी केली जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६) दरम्यान, मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट/अयोग्य तिकीटासह प्रवास करणाऱ्या ९.४९ लाख उपनगरीय प्रवाशांकडून दंड म्हणून २७.३९ कोटी रुपये वसूल केला आहे. जानेवारी महिन्यात अशा १.१४ लाख प्रकरणांत ३.४२ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, अधिकृत विक्रेत्यांनी  किंवा रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटरवरून किंवा  एटीव्हीएमद्वारे जारी केलेल्या वैध तिकिटांसह प्रवास करावा  किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर वेबसाइटद्वारे रेल वन ॲप डाउनलोड करून रेल वन ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकता. मध्य रेल्वे प्रवाशांना बनावट तिकिटे तयार करणे/मिळविणे आणि त्यावर प्रवास करण्याऱ्या फसव्या मार्गांचा वापर करू नये असे आवाहन करते. 

- भुसावळ विभागात ८.१८ लाख प्रकरणांमध्ये ६८.८६ कोटी रुपये- ⁠मुंबई विभागात १४.५१ लाख प्रकरणांमध्ये ६२.७३ कोटी रुपये- ⁠पुणे विभागात ३.८४ लाख प्रकरणांमध्ये २३.७३ कोटी रुपये- ⁠नागपूर विभागात ३.६८ लाख प्रकरणांमध्ये २२.९१ कोटी रुपये- ⁠सोलापूर विभागात २.०६ लाख प्रकरणांमध्ये ९.४६ कोटी रुपये  - ⁠मुख्यालय अंतर्गत २.०६ लाख प्रकरणांमध्ये १६.०६ कोटी रुपये.

English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway collects ₹203.76 crore from 34.34 lakh unauthorized travelers.

Web Summary : Central Railway fined 34.34 lakh unauthorized passengers ₹203.76 crore in ten months. Ticket checking drives increased by 9.8%. Revenue from fines rose 21% compared to last year, demonstrating Central Railway's commitment to curbing unauthorized travel.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेticketतिकिटIndian Railwayभारतीय रेल्वे