शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकाबाहेर २000 दुचाकींचे पार्किंग; एक मजल्याची पार्किंग इमारत

By admin | Updated: January 31, 2015 05:30 IST

मुंबईतील पार्किंग समस्येने रेल्वे स्थानकांनाही या ग्रासले आहे. स्थानकाबाहेर प्रवाशांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने वाहतुक

मुंबई : मुंबईतील पार्किंग समस्येने रेल्वे स्थानकांनाही या ग्रासले आहे. स्थानकाबाहेर प्रवाशांच्या वाहनांची एकच गर्दी होत असल्याने वाहतुक कोंडीबरोबरच अन्य प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून रेल्वेकडून पार्किंगची व्यवस्था केली जात असून ठाणे स्थानकाबाहेर एक मजली पार्किंग इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दोन हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. या कामाची निविदा येत्या दोन ते तीन दिवसांत काढण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. वाहने उभे करण्यासाठी वाहन मालकाकडून जोपर्यंत जागा उपलब्ध असल्याचे सांगितले जात नाही, तोपर्यंत वाहनांची नोंदणी होणार नाही,अशा अटीची योजना असलेली सूचनाही नुकतीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. यातून पार्किंगची समस्या किती मोठी आहे हे न्यायालयाने दाखवून दिले. रेल्वे स्थानकांबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जाते. ठाणे स्थानकाबाहेर तर पार्किंगचा प्रश्न अधिक गहन झाला असून ती सोडविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस, टीएमटी बसेस जाण्यासाठी पुल असून त्या खालून जाणाऱ्या रिक्षा आणि दुचाकी आणि अन्य वाहनांची संख्या अधिक असते. तसेच दुचाकीस्वार तर स्थानकाबाहेरच पार्किंग करुन जातात. हे पाहता ठाणे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मबाहेर असलेल्या रेल्वेच्या जागेत एक मजली इमारत वाहन पाार्किंगसाठी उभारली जाणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले की, या इमारतीत फक्त दुचाकींचे पार्किंग होईल. दोन हजार दुचाकींच्या पार्किंगसाठी ही व्यवस्था असेल. या कामाची दोन ते तीन दिवसांत निविदा काढली जाणार असून हे काम या डिसेंबर महिन्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)