शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या करवाढीला सर्वपक्षीय विरोध

By admin | Updated: February 25, 2015 02:27 IST

महापालिकेने मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ, हस्तांतरण, मलनि:सारण करात सुमारे ५ ते ७ टक्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला

ठाणे : महापालिकेने मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ, हस्तांतरण, मलनि:सारण करात सुमारे ५ ते ७ टक्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच घरगुती पाणी वापराच्या आकरात, शहर विकास विभाग, घनकचरा सेवा शुल्क, जाहीरातदर, आदींमध्ये करवाढ, दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी महासभेच्या पटलावर आले आहेत. परंतु या करवाढीला लोकशाही आघाडीने विरोध केला आहे. तर शिवसेनेने सर्वसामान्यांना त्रास होईल असा कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका घेतली आहे. मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या जललाभ कर, मलनि:सारण आणि हस्तांतरण करात ५ ते ७ टक्यांची वाढ सुचविली आहे. या करवाढीमुळे पालिकेचे उत्पन्न २५ ते ३० कोटींनी वाढणार आहे. तसेच घरगुती पाणी वापराच्या आकारातही वाढ होणार आहे. झोपडपट्टीसाठी ही दरवाढ ३० रुपयांची असेल. सदनिकांमध्ये राहणाऱ्यांसाठी ही दरवाढ चौरसफुटा प्रमाणे असणार आहे. याशिवाय शहर विकास विभाग, घनकचरा सेवा शुल्क, जाहिरात दर यांमध्ये देखील महापालिकेने वाढ करण्याचे निश्चित केले आहे. परंतु याला आता लोकशाही आघाडीने विरोध दर्शविला असून विकासाची कोणतीही कामे नसताना केवळ करवाढ करून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. करवाढीला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान दुसरीकडे मनसे देखील या करवाढीला विरोध केला आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष महासभेकडे आहे. (प्रतिनिधी)