शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठी उद्योग उभारणीस विरोध

By admin | Updated: January 20, 2015 02:17 IST

नदीपात्राच्या दोन्ही बाजूंस २ कि.मी. अंतरात उद्योग उभारणीवर असलेले निर्बंध उठवण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केलेल्या प्रस्तावाला शिवसेनेकडील पर्यावरण विभागाने विरोध केला आहे. ‘

संदीप प्रधान ल्ल मुंबईनदीपात्राच्या दोन्ही बाजूंस २ कि.मी. अंतरात उद्योग उभारणीवर असलेले निर्बंध उठवण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केलेल्या प्रस्तावाला शिवसेनेकडील पर्यावरण विभागाने विरोध केला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ या देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेकरिता सध्या असलेले काही निर्बंध उठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असताना या निर्णयामुळे उद्योगांकडून होणाऱ्या प्रदूषणात भरमसाठ वाढ होईल, त्यामुळे हे निर्बंध उठवण्यास पर्यावरण विभागाने प्रखर विरोध केला आहे.नदीपात्रालगत उद्योग उभे राहू नयेत व जलस्रोत प्रदूषित होऊ नये याकरिता २ कि.मी. अंतरात उद्योग उभे करण्यास बंदी होती. मात्र आता ही बंदी उठवताना नदीकाठी उद्योग उभारणीस परवानगी देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. या उद्योगांकडून प्रदूषण होऊ नये याकरिता जिल्हावार त्रयस्थ यंत्रणेमार्फत उद्योगांची तपासणी केली जाणार आहे. प्रदूषणानुसार त्यांना श्रेणी दिली जाणार आहे. कुठला उद्योग किती प्रमाणात प्रदूषण करीत आहे त्याची माहिती जाहीर केली जाणार आहे. युरोपिय देशांत नदीकाठी उद्योग उभे आहेत. नदीकाठी उद्योग उभे न करण्याच्या धोरणामुळे अतिक्रमणाचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येतो, असे मुख्यमंत्री कार्यालयाचे मत आहे.पर्यावरण विभागाने या धोरणाला विरोध केला आहे. नदी पात्रालगत उद्योग उभे करायला देण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असे या खात्याचे मत आहे. सध्याच्या नियमानुसार प्रदूषणकारी कारखान्यांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्लान्ट उभारणे सक्तीचे आहे. अनेक उद्योग ते उभेही करतात. परंतु असे प्लान्ट चालवणे हे परवडत नसल्याने बहुतांश उद्योग ते बंद ठेवतात व सांडपाणी सोडून देतात. राज्य सरकारच्या एमआयडीसीमध्ये उभारलेले बहुतांश सांडपाणी प्रक्रिया प्लान्ट बंद आहेत. तेथील अनेक उद्योग एमआयडीसीच्या प्लान्टमध्ये सांडपाणी सोडून मोकळे होतात. परिणामी, एमआयडीसी परिसरातील प्रदूषण वाढलेले आहे. हा सर्व पूर्वानुभव लक्षात घेऊन सरकारचा हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असे पर्यावरण विभागाला वाटते.