शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे मुसळे, रेड्डींच्या उमेदवारीवर आक्षेप

By admin | Updated: September 30, 2014 00:40 IST

भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले

आज निकाल : शासकीय कंत्राटदार असल्याचा विरोधकांचा दावा सावनेर/रामटेक : भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत उद्या, मंगळवारपर्यंत निर्णय राखून ठेवला. भाजपचे सावनेरचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्याद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतले असल्याचा आरोप मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी करीत लेखी तक्रार नोंदविली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी विनोद हरकंडे मुसळे यांना सायंकाळी ५ पर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याची सूचना केली. ५ वाजता दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उद्या सकाळपर्यंत निर्णय राखून ठेवला. यावेळी दोन्ही गटाकडील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सावनेरमध्येच एका प्रकरणात अपक्ष उमेदवार उज्ज्वलकुमार बागडे यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील केदार यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. अपूर्ण माहिती तसेच माहिती दडवून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने उमेदवारी रद्द करण्याची लेखी तक्रार पुराव्यासह केली. मात्र उमेदवारी अर्ज छाननीची वेळ निघून गेल्यानंतर हा आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केदार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला. रामटेकमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर शिवसेनचे उमेदवार अ‍ॅड. आशिष जयस्वाल आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या उमेदवार राणी राजश्रीदेवी बुलंदशहा यांनी आक्षेप नोंदविला. शासनाकडून लाभ घेत असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही, या कारणासाठी त्यांनी रेड्डी यांच्याविरुद्ध आक्षेप नोंदविला. याबाबत रेड्डी यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. सदर प्रकरणाबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला असून, उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. रेड्डी यांना यासंबंधात विचारले असता काही दिवसांपूर्वीच त्यांनी फर्म आरबीसीमधून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. तसे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. परंतु ते अर्जासोबत जोडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. आक्षेप घेतल्यानंतर मात्र ते प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)