शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

४ ऑगस्ट ला कांदा आंदोलन, वेळ प्रसंगी पुन्हा रेल रोको

By admin | Updated: July 10, 2014 23:15 IST

शरद जोशी यांचा इशारा

शेगाव: केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थ संकल्प शेतकर्‍यांसाठी अत्यंत निराशाजनक असुन कांदा उत्पादकांना न्याय मिळुवुन देण्यासाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी आपण मोठय़ा प्रमाणात आंदोलन करणार आहो अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी दिली.येत्या विधासभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधनी आणि राज्यातील राजकीय घडामोडींनवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वंतत्र भारत पक्षांच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक शेगाव येथील कुणबी समाज भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,या देशाला आंदोलनांची भाषा समजते शेतकर्‍याची नेहमींच मरण केल्या जाते. या साठी मी ४ ऑगस्ट रोजी नाशिक भागातील शेकर्‍यांची भेट घेणार आहे.आणि तेथेंच कांदा आंदोलन जाहिर करेल असे ते म्हणाले. आपण कुठले आंदोलन करणार असे विचारले असता वेळ प्रसंगी रेल रोको करण्याची पाळी आली ते ही मोठय़ा प्रमाणात करेल असे त्यांनी सांगीतले. राज्यभरात विधानसभे साठी आपण उम्मेदवार उभे करणार का ? असे विचारले असता राज्यातील शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची बलस्थाने असलेल्या ठिकाणी आपण निवडणुक लढविणार आहो असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषेदेला माजी आमदार वामनराव चटप, रमेश देवांग, अँड.दिनेश शर्मा, गुणवंत पाटील,शैलेजा देशपांडे, संजय कोल्हे आदिंची यावेळी उपस्थिती होती.