शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:22 IST

Khandala Crime: खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली.

खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले. जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर खंडाळा गाव आणि वैजापूर शहरात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले. सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोईन मुख्तार शाह (वय, २४), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, शेख अब्रार आरिफ शेख (वय २३) आणि शोएब असीम पठाण (वय २३) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही. परंतु, जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी झाली, असे सांगितले जात आहे.

गौरव राजू अनर्थ (रा. भाऊगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्नावरे आणि नंदू पोपट जानराव (सर्व रहिवासी खंडाळा) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, गौरव आणि त्याच्या साथीदारांनी मोईन, अबरार आणि शोएबवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी रात्री गावाला भेट दिली.

आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृत मोईन मुख्तार शाह यांचे कुटुंबीय उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने जमले. कारवाई होईपर्यंत त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. कुटुंबाच्या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. शुक्रवारी पहाटे २:०० वाजता सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र