मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात : एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 20:03 IST2018-09-04T19:22:39+5:302018-09-04T20:03:03+5:30
मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला पाठीमागून चालकाचे वेगात नियंत्रण सुटल्याने कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला.

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात : एक ठार, दोन जखमी
कामशेत :द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीत डिझेल संपल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रेलर व विरुद्ध दिशेने ओव्हर टेक करणारी कार आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवार [ दि. ४ ] रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ताजे गावाच्या हद्दीत किलोमीटर नंबर ६८/४०० मुंबई पुणे लेनवर डिझेल संपल्याने लेन नं. ३ व ४ वर उभ्या असलेला ट्रेलरला [ क्र. एम एच ४६ ए एफ ०४१० ] विरुद्ध दिशेने दुसऱ्या वाहनाला वेगात ओव्हर टेक करणारी कार [ क्र. एम एच १४ जी एच ८२३९ ] चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रेलरला मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात कार मधील मारुती भाऊ थोरात [ वय ५८, रा. चांडोली, ता. आंबेगाव पुणे ] याचा जागीच मृत्यू झाला असून नितीन भाऊ थोरात [ वय ३४, रा. चांडोली, ता. आंबेगाव पुणे ] आणि शांताबाई मारुती थोरात [ वय ५४, रा. चांडोली, ता. आंबेगाव पुणे ] हे गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेलर चालक समाधान रंगनाथ यादव [ वय ३२, रा. सोलापूर ] याने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपघातातील जखमींवर लोकमान्य हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. द्रुतगती पेट्रोलिंग कर्मचारी संजय राक्षे, सतीश वाळुंजकर, संतोष वाळुंजकर यांनी या अपघाताची माहिती कामशेत पोलीस ठाण्यात दिली. व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवली.