शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

एकीकडे मराठीचा जागर, दुसरीकडे शाळा मृत्युपंथाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 2:48 AM

नाशिकमध्ये दरवर्षी साडेतीन हजार मुलांची घट

- संजय पाठकनाशिक : इंग्रजी शाळांमध्येमराठीची सक्ती करताना प्रत्यक्षात शासनाचे धोरण आणि पालकांचे इंग्रजी प्रेम यामुळे नाशिकसह राज्यात अनेक मराठीशाळा मृत्युपंथाला लागल्या आहेत. नाशिकमध्ये पाच वर्षांत निम्म्या मराठी शाळा कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मराठी शाळांमधील मुलांचे प्रमाण सरासरी साडेतीन हजाराने घटले आहे. तर इंग्रजी शाळेत जाणाऱ्यांचे प्रमाण वर्षाकाठी पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत नाशिकमधील किमान ५० टक्के मराठी शाळा बंद पडतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.मराठी माध्यमांच्या विशेषत: अनुदानित शाळांना आता वेतन खर्चाच्या चार टक्के अनुदान दिले जाते. तेही वेळेवर मिळत नसल्याने भाड्याच्या शाळांना घरपट्टी, पाणीपट्टी भरणे कठीण झाले आहे. राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विशेष सुविधा दिली असून, २५ टक्के कोट्यातून प्रवेशासाठी पालक आटापिटा करीत असतात. अनुदानित शाळांचे अनुदान बंद केले जाते आणि दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे शुल्क देऊन शासन सरकारी खर्चाने इंग्रजी माध्यमांच्या प्रसारावर भर देत आहे, अशी टीका मराठी शाळांच्या संस्थाचालकांकडून होत आहे.महापालिकेच्या ३७ शाळा बंदकिमान प्राथमिक शिक्षण म्युनिसिपाल्टीच्या शाळेतच झाले पाहिजे असा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा आग्रह होता. पालिकेच्या १२७ प्राथमिक मराठी शाळा होत्या. घटत्या पटसंख्येमुळे त्यांचे एकत्रीकरण करून ९० वर आल्या. म्हणजेच ३७ शाळा बंद झाल्या. विद्यार्थी संख्या ४५ हजारांवरून २७ हजारांवर आली.इंग्रजी माध्यमांचे प्रस्थराज्य शासनाचे स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरू करण्याचे धोरणदेखील मराठी शाळांना मारक ठरले आहे. या धोरणाअंतर्गत नाशिक शहरातच ११७ शाळा सुरू झाल्या असून त्यात एकच मराठी शाळा आहे. अन्य सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.मराठी अनुदानित शाळांना अनुदान न देणे, शिक्षक भरतीवर निर्बंध, शिक्षक तसेच कर्मचारी न देणे तसेच आरटीईतून इंग्रजी शाळेत प्रवेश देणे या धोरणामुळे मराठी भाषेसाठी तरी मराठी शाळा वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.- राजेंद्र निकम, सरचिटणीस, नाशिक एज्युकेशन सोसायटीनाशिकमधील प्राथमिक शाळांची स्थितीमहापालिका                   90खासगी अनुदानित          81कायम विनाअनुदानित    31स्वयंअर्थसहाय्यीत          118

टॅग्स :Schoolशाळाmarathiमराठी