शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा संत्रा दलालाने परस्पर विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:52 IST

Crime News दलालाची थातूरमातूर चौकशी करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनपूर्वी हैदराबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा संत्रा संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी आठ शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र फक्त एकवेळ शेतकऱ्यांसोबत जाऊन दलालाची थातूरमातूर चौकशी करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद‌्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैदराबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये २० हजार ८७७ क्रेटमध्ये ४६८९.६३ क्विंटल आणि वडोदरा (गुजरात) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ६५० क्रेटमध्ये १४३ क्विंटल संत्रा साठवून ठेवला होता. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कोल्ड स्टोरेजमधून संत्रा काढून तो विक्री करण्याचे नियोजन संबंधित शेतकऱ्यांचे होते; मात्र २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने संत्रा कोल्ड स्टोरेजमध्येच अडकून पडला. कालांतराने कोरोना संकटाची परिस्थिती निवळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दलालाकडे संत्र्याची मागणी केली असता, तो मिळाला नाही. याप्रकरणी मुंगळा येथील लक्ष्मण राऊत, महादा राऊत, संतोष मनोहर राऊत, संतोष केळे, संतोष बबन राऊत आणि मोतीराम सोनुने या शेतकऱ्यांनी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित दलालाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली; परंतु तीन महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीच विशेष हालचाल केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे

हैदराबादच्या पोलीस ठाण्यातही तक्रारमुंगळा येथील शेतकऱ्यांनी मालेगाव पोलीस ठाण्यासोबतच हैदराबाद येथील ठाण्यातही एक कोटी रुपये किमतीचा संत्रा परस्पर विकणाऱ्या दलालावर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. असे असले तरी संबंधित दलालावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही, असे तक्रारकर्ते शेतकरी महादा राऊत यांनी सांगितले.

शेतात अहोरात्र कष्ट करून पिकविलेला संत्रा सुरक्षित राहावा आणि चांगला दर मिळून फायदा व्हावा, या उद्देशाने हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता; मात्र तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही.- संतोष गजानन केळेसंत्रा उत्पादक शेतकरी, मुंगळा

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीfraudधोकेबाजी