OMG! corona patient saw health team and ran away, caught after hour later | बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

माजलगाव ( बीड ) : शहरातील जिजामातानगर भागात राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी आरोग्य पथक व पोलीस गेले. मात्र, त्यांना पाहताच रुग्णाने धूम ठोकल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली. पोलिसांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आले.
   
माजलगाव शहरात मागील आठ दिवसात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी माजलगाव तालुक्यात शनिवारी 19 रूग्ण पॉझिटीव्ह निघाले होते. त्यात माजलगाव  शहरातील तानाजीनगर भागातील एका युवा रूग्णाचा समावेश होता. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोग्य सेवक ,पोलीस , नगरपालिकेचे कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने घराबाहेर येऊन तेथुन धुम ठोकली. यामुळे सर्व यंत्रणा व नागरिक हैराण झाले.

 त्याच्यामागे पोलीस व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पिच्छा केला व एक तासाच्या परिश्रमानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो पर्यंत त्या रुग्णाने पळत असतांना 2-3 जणांचा धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्या रूग्णाला ताब्यात घेताच पोलीस , आरोग्य यंत्रणा , नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी निश्वास सोडला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट

Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर; भाजपा आमदार हत्याकांडातील गँगस्टरचा खात्मा

आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG! corona patient saw health team and ran away, caught after hour later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.