रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 09:47 AM2020-08-09T09:47:14+5:302020-08-09T12:39:38+5:30

सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते.

CA is also involved in Sushant's money transfers; rhea chakraborty told to ED | रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट

रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट

Next

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून ईडीच्या चौकशीत रियाने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतच्या खात्यातून करोडो रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्तीची ईडीने आठ तास चौकशी केली. यामध्ये रियाने सुशांतच्या सीएचेही नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. रियाने सुशांतचेच नाहीत तर त्याचा मोठ्या बहिणीच्या एफडीवरही डल्ला मारला आहे. 


सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. मात्र, या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने लक्ष घातल्यावर साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. रियाने ही चौकशी थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालात धाव घेतली आहे. तर मुंबई पोलिसांनीही सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. 


या साऱ्या पार्श्वभूमीवर ईडीने रिया आणि तिच्या भावाला चौकशीला बोलावले होते. रियाची 8 तास आणि तिच्या भावाची दुसऱ्या दिवशी 18 तास चौकशी करण्यात आली. यामध्ये रियाने ईडीला सीएचे नाव घेत त्यांचाही यात सहभाग असल्याचे सांगितले आहे. सुशांतने त्याच्या मोठ्या बहीणीच्या नावे साडे चार कोटी रुपयांची एफडी ठेवली होती. मात्र, रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर दोन्ही सीए आणि तिच्या भावाने मिळून त्यातील अडीज कोटी रुपये गायब केले. यामुळे सुशांतच्या बहिणीच्या एफडीमध्ये केवळ दोन कोटी रुपयेच राहिले आहेत, असे सुत्रांनी सांगितले.



रियाने ईडीला सांगितले की, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा लेखाजोखा पाहणाऱ्या दोन चार्टड अकाऊंटटना दोन कोटी 65 लाख रुपये देण्यात आले. 


याशिवाय ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले आहे. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सारेकाही समोर येणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर; भाजपा आमदार हत्याकांडातील गँगस्टरचा खात्मा

आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Web Title: CA is also involved in Sushant's money transfers; rhea chakraborty told to ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.