नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:03 PM2020-08-07T12:03:41+5:302020-08-07T12:38:44+5:30

RBI ने सांगितले की, दुर्गम भागात इंटरनेट नसते किंवा त्याचा वेग खूप कमी असतो. यामुळे डिजिटल पेमेंट करता येत नाही. यामुळे कार्ड, वॉलेट, मोबाईलद्वारे ऑफलाईन पेमेंट करण्याचा पर्याय दिला जात आहे.

New feature! Money can be sent without internet by wallet, cards; RBI announcement | नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

Next

इंटरनेट आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे माध्यम बनले आहे. अनेकदा एखाद्या आप्तस्वकीयाला किंवा दुकानदाराला पैसे पाठवायचे असतात परंतू इंटरनेट नसल्याने यामध्ये अडथळे येतात. आता त्यावर केंद्र सरकारने उपाय शोधला आहे. रिझर्व्ह बँकेने आता अशी यंत्रणा उभारली आहे की इंटरनेटशिवाय तुम्ही डिजिटल पैशांचे व्यवहार करू शकणार आहात. 


सध्या ही सुविधा प्राथमिक स्वरुपात आहे. या ऑफलाईन सुविधेद्वारे तुम्ही कार्ड आणि मोबाईलद्वारे छोटी रक्कम पाठवू किंवा भरू शकणार आहात. यानुसार एकावेळी 200 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. देशात अशा अनेक जागा आहेत जिथे अद्याप इंटरनेट पोहोचलेले नाही किंवा कनेक्टिव्हीटी कमी आहे. अशा ठिकाणच्या लोकांपर्यंत डिजिटल व्यवहारांना पोहोचविणे यामागचा उद्देश आहे. या नव्या सुविधेनुसार एटीएम कार्ड, वॉलेट किंवा मोबाईलव अन्य उपकरणांद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. यासाठी कोणत्याही व्हेरिफिकेशनची गरज भासणार नाही. 


हा पायलट प्रोजेक्ट असल्याने सध्यातरी एका व्यवहारामध्ये 200 रुपयेच पाठविता येणार आहेत. भविष्य़ात ही रक्कम वाढविली जाणार आहे. काही काळाने आरबीआय अधिकृत यंत्रणा स्थापण्याचा निर्णय घेणार आहे. ही योजना 31 मार्च, 2021 पर्यंत राबविली जाणार आहे. मोबाईलमध्ये असलेली वॉलेट, भीम अॅप यामध्येची ही सुविधा देण्यात येणार आहे.


RBI ने सांगितले की, दुर्गम भागात इंटरनेट नसते किंवा त्याचा वेग खूप कमी असतो. यामुळे डिजिटल पेमेंट करता येत नाही. यामुळे कार्ड, वॉलेट, मोबाईलद्वारे ऑफलाईन पेमेंट करण्याचा पर्याय दिला जात आहे. यामुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल. तसेच यामध्ये तक्रारींची दखल घेतली जाणार असून त्याची व्यवस्था पारदर्शक असणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. जरी असला तरी तो नगण्य असणार आहे. या प्रणालीद्वारे तक्रारी वेळवर आणि प्रभावीपणे सोडविण्यात येणार आहेत. यासाठी Online Dispute Resolution (ODR) यंत्रणा उभारली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Web Title: New feature! Money can be sent without internet by wallet, cards; RBI announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.