Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 08:53 AM2020-08-09T08:53:02+5:302020-08-09T08:56:57+5:30

Sarkari Naukari: उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. यासाठी 3 तासांची परिक्षा असणार आहे.

Sarkari Naukari: bumper Job opportunities in AIIMS; Nurses will get 7th pay commission | Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

googlenewsNext

AIIMS Nursing Officer Recruitment 2020: ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (AIIMS) मध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी मोठी भरती काढण्य़ात आली आहे. AIIMS Nursing Officer Recruitment नुसार 3803 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या नर्सिंग ऑफिसरना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. 


ही भरती प्रक्रिया नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट (NORCET) 2020 द्वारे केली जाणार आहे. एम्सच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंडियन नर्सिंग काउंसिल, स्टेट नर्सिंग काउंसिल द्वारा मान्यताप्राप्त संस्थांमधून बीएससी नर्सिंग किंवा बीएससी (पोस्ट सर्टिफिकेशन)/पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग उत्तीर्ण केलेले असावे. 


AIIMS Nursing Officer च्या पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे. तर SC/ST वर्गासाठी 5 वर्षे आणि ओबीसीसाठी 3 वर्षे वयाची सूट दिली जाणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. यासाठी 3 तासांची परिक्षा असणार आहे. यामध्ये 200 मार्कसाठी 200 वैकल्पिक प्रश्न विचारले जाणार आहेत. 


फी
या पदांसाठी जनरल, ओबीसीसाठी 1500 रुपये आणि SC/ST साठी 1200 रुपये फी आकारली जाणार आहे. 
ऑनलाीन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 असून परिक्षा 1 सप्टेंबर 2020 ला घेतली जाणार आहे. 


अर्ज कसा कराल?
AIIMS नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी इच्छुकांनी aiimsexams.org वर जाऊन 18 ऑगस्ट 2020 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करावे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत

आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Web Title: Sarkari Naukari: bumper Job opportunities in AIIMS; Nurses will get 7th pay commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.