शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या पार्टीत भिजले ओझर विमानतळ !

By admin | Updated: February 2, 2015 06:14 IST

संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती,

गणेश धुरी, नाशिक संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती, तर सार्वजनिक बांंधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिका-याच्या सेवानिवृत्तीनिमित्त रंगल्याचे उघड झाले आहे. जानोरी ग्रामस्थांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर पार्टी थांबविण्यात आल्याचे समजते. दिंडोरीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी या पार्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीसाठी हा रंगारंग कार्यक्रम आयोजित केल्याचे समजते. खास मुंबईहून मागविलेला रंगारंग आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री सव्वानऊ वाजता संगीत रजनीतील लावण्यांचा कार्यक्रम डीजेच्या आवाजात घुमू लागला. त्यामुळे जानोरीचे सरपंच नामदेव उंबरसाडे यांनी ग्रामस्थांसह विमानतळाकडे धाव घेतली. परंतु सुरक्षारक्षकांनी परवानगी घेऊन कार्यक्रम सुरू असल्याचे सांगत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व बडे अधिकारी, काही मक्तेदार कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच रात्री दीड वाजेपर्यंत साग्रसंगीत पार्टीचा कार्यक्रम सुरू होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार समजताच रविवारी त्यांनी विमानतळावर धाव घेत दिंडोरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना बोलावून घेतले. मात्र तत्पूर्वी आयोजकांनी घाईगर्दीत मद्याच्या बाटल्या व उरलेले खाद्यपदार्थ टेम्पोमध्ये भरून नेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ओझर विमानतळाला लागूनच नव्याने झालेल्या विमानतळावर असा कार्यक्रम कसा होऊ शकतो, असा गावकऱ्यांचा सवाल आहे.