शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना खडसावले

By admin | Updated: June 11, 2015 01:17 IST

राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत

मुंबई : राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य बँक, जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना खडसावले. शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्जाची फेररचना करताना शेतकऱ्यांचे कर्ज कायम राहते आणि जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच ही फेररचना पुन्हा एकदा बँकांच्या पथ्यावर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. नियमांवर बोट ठेवायचे आणि वर्षानुवर्षे चाललेले पठडीतील धोरण राबवून ‘लकीर के फकीर’ बनून काम करायचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. शेतकऱ्यांवरील कर्जाची फेररचना करताना जिल्हा बँका नव्या कर्जातून आधीचे कर्ज कापून घेतात. त्यामुळे बँकांना पैसा मिळतो, पण शेतकरी पुन्हा कर्जबाजारीच राहतो. या पद्धतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही, असा ठोस प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. (विशेष प्रतिनिधी)