शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

औषधखरेदीसाठी अधिका:यांची टाळाटाळ

By admin | Updated: July 10, 2014 00:06 IST

औषधांच्या खरेदीची प्रक्रिया तातडीने राबविण्याऐवजी आरोग्य विभागातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणो : शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना डासांचा प्रतिबंध करण्यासाठी औषधांच्या खरेदीची प्रक्रिया तातडीने राबविण्याऐवजी आरोग्य विभागातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहा महिन्यांपूर्वी कीटकनाशक औषधाची वाढीव खरेदी वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे खरेदी प्रक्रिया राबविण्यास अधिकारी धजावत नाहीत. औषधखरेदी रखडल्याने डेंगीची तीव्रता वाढण्याची भीती मात्र कायम आहे.
डासांचा नायनाट करण्यासाठी आवश्यक कीटकनाशकांची खरेदीच महापालिकेने 2क्13-14 मध्ये केली नाही. त्यामुळे शिल्लक औषधांवरच डास गेले. डासांचा बंदोबस्त करण्याचे काम कीटकनाशक विभागाचे असल्याने त्यांना कीटकनाशके खरेदीचे अधिकार होते. मात्र, गेल्या वर्षी या विभागाकडून हे अधिकार काढून घेण्यात आले आणि मेडिकल विभागाकडे ते देण्यात आले. औषधे नसल्यामुळे नवी कीटकनाशके घेण्यासाठी निविदा प्रक्रिया या वर्षाच्या सुरुवातीला राबविण्यात आली होती. मात्र, त्यात राज्यशासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा चढय़ा दराने या निविदा राबविण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने स्वयंसेवी संस्थांनी याविरुद्ध आवाज उठविला होता. त्याची दखल घेत पालिका स्थायी समितीने ही निविदा रद्द केली होती. या घोळामध्ये कीटकनाशके खरेदी रखडली होती.
दरम्यान, औषधेच नसल्याने या वर्षात शहरात औषधफवारणी खूपच कमी प्रमाणात करण्यात आली.  राज्यशासनाकडे पालिकेने हात पसरून थोडी-थोडी औषधे मिळवली. मात्र तीही संपल्याने आणि शहरात डेंगीचा उद्रेक झाल्याने तातडीने कीटकनाशके खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वर्क ऑर्डर काढून 7 प्रकारची कीटकनाशके खरेदीची प्रक्रिया मेडिकल विभागाकडून राबविण्यात आली. मात्र, यातील टेमिफॉस व बीटीआय ही कीटकनाशके राज्यशासनाच्या दरानुसार देण्यास कंपन्यांनी नकार दिला. यामुळे हतबल झालेल्या मेडिकल विभागाने या औषधांची खरेदी कीटकनाशक विभागाने करावी, असे आरोग्य विभागाच्या प्रमुखांना कळविले. त्यानुसार प्रमुखांनी कीटकनाशक विभागप्रमुखांना ती खरेदी तुम्ही करावी, असे कळविले आहे. मात्र, आता कीटकनाशक विभागप्रमुखांनी ही खरेदी करणो माङया अधिकारात येत नसल्याचे सांगत खरेदीस नकार दिला आहे. (प्रतिनिधी)
 
तक्रारींनी नगरसेवक हैराण
कीटकनाशके शहरात फवारली जात नसल्याने डासांची उत्पत्ती झपाटय़ाने होत आहे. त्याविषयीच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून केल्या जात आहे. मात्र, औषध नसल्याचे सांगून अधिका:यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे नगरसेवकही वैतागलेले आहेत.