शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, दलालांची हातमिळवणी

By admin | Updated: February 3, 2015 01:44 IST

आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले.

मुंबई : आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांशी हातमिळवणी करून कामे करीत असल्याची माहिती परिवहन विभागाला मिळाली असून, त्यामुळे निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे.आरटीओ दलालमुक्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर १२ जानेवारी २0१५ रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओ १७ जानेवारीपासून दलालमुक्त करण्याचे आदेश आरटीओंना दिले आणि १९ जानेवारीपासून आरटीओंना अचानक भेट देणार असल्याचेही सांगितले. यात दुर्लक्ष झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची ताकीदही परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांच्या संपर्कात असल्याचे परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ३१ जानेवारी २0१५ रोजी एक पत्रक काढण्यात आले असून, यात सर्व आरटीओतून अनधिकृत व्यक्तींना वावर करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही आरटीओंबाहेरील अनधिकृत व्यक्ती आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून कार्यालयाबाहेरून कागदपत्रे पाठवून अनधिकृतपणे नागरिकांची कामे करून देत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे हातमिळवणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही या पत्रकातून दिला आहे. यातूनच अजूनही आरटीओ अधिकारी आणि दलालांचा संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)राज्यातील आरटीओ कार्यालयांना दलालांचा विळखा बसल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे आकारून अनेक कामे करावी लागत आहेत. यात आरटीओतील कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात साथ दलालांना मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने २00७ आणि २0१२ रोजी आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले.