शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आता विमान प्रवाशांना लागणार नाहीत झटके

By admin | Updated: May 25, 2014 00:55 IST

आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे

रिकार्पेटिंगचे काम पूर्ण : विमानसेवाही झाली सुरळीत

नागपूर : आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे पडल्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना विमान लँडिंग आणि टेकऑफ होताना झटके बसत होते. परंतू आता रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे ही समस्या दूर झाली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ३ हजार २00 मीटर लांबीच्या धावपट्टीची रिकार्पेटिंग २00३-0४ मध्ये करण्यात आली होती. नियमानुसार ५ वर्षानंतर धावपट्टीवर नवे आवरण चढविणे गरजेचे आहे. परंतू दुप्पट कालावधी उलटल्यानंतरही रिकार्पेटिंग झाले नव्हते. धावपट्टीची डागडुजी करून तात्पुरते काम भागविण्यात येत होते. यामुळे वैमानिकाला आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता. मागील वर्षी भारतीय विमान प्राधिकरणाकडे हे काम सोपविण्यात आले होते.

भारतीय विमान प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (सीएनएस) शफीक शाह यांनी सांगितले की, धावपट्टीवर ४ इंच मोठे आवरण चढविण्यात आले आहे. सध्या धावपट्टीच्या किनार्‍यावर ग्रेडिंग आणि साईड लेव्हलींगचे काम सुरू आहे.

यामुळे धावपट्टीवर पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही. धावपट्टीवर प्रत्येक ठिकाणी लेव्हलची तपासणी करून मजबूत आवरण चढविण्यात आले आहे.

धावपट्टी बंद ठेवण्याची वेळ संपली

वरिष्ठ विमानतळ संचालक अनिल कुमार म्हणाले, रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे विमानांचे संचालन सुरळीत झाले आहे. हे काम होण्यापूर्वी सकाळी ९.३0 ते दुपारी ४.३0 दरम्यान धावपट्टी बंद ठेवण्यात येत होती.

सध्या धावपट्टीवर काही काम शिल्लक असल्यामुळे दुपारी १ ते दुपारी ४.३0 पर्यंंंत धावपट्टी बंद ठेवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)