शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘मिशन जेईई-अ‍ॅडव्हान्स’

By admin | Updated: May 24, 2014 01:03 IST

देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’

२५ मे रोजी परीक्षा : उपराजधानीतून ४०० हून अधिक विद्यार्थी तयारीत

नागपूर : देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा होणार असून यातील गुणांच्या आधारे ‘आयआयटी’ व ‘आयएसएम-धनबाद’ सारख्या संस्थेचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. या महत्त्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी कसून तयारीला लागले आहेत. देशस्तरावर ‘जेईई-मेन्स’मधून पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. नागपुरातील महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी ‘जेईई’साठी अर्ज केला होता. त्यातील ४०० हून अधिक विद्यार्थी ‘आयआयटी-अ‍ॅडव्हान्स’या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यासाठी केवळ चारच शहरात केंद्र देण्यात आली आहेत. यात नागपूरचादेखील समावेश आहे. ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेत विद्यार्थ्यांना ३ तासांचे २ पेपर द्यावे लागणार आहेत. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ या वेळेत असून दुसरा पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत आहे. दोन्ही पेपरमध्ये गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रश्न राहतील. इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत प्रश्न विचारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा सरावावर भर ४दरम्यान, ‘जेईई-मेन्स’च्या निकालानंतर ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू आहे. बहुतांश शिकवणी वर्गात दिवसभरात निरनिराळ्या सत्रांत विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ-स्डडी’ तसेच सरावावर भर दिला आहे. या परीक्षेत हुशारीसोबतच ‘टाइम मॅनेजमेन्ट’ व समयसूचकता हेदेखील आवश्यक मुद्दे ठरणार आहेत. मूळ प्रवेशपत्र केंद्रांवरच मिळणार ४‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर इंटरनेटवरुन ‘डाऊनलोड’ केलेले ओळखपत्र न्यायचे आहे. परीक्षा केंद्रांवरच ओळख पटविल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ प्रवेशपत्र दिले जाणार आहे. हे मूळ प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी सांभाळून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण प्रवेशादरम्यान हे ओळखपत्र विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार आहे.