आता महाभारत युतीधर्मावरून!

By Admin | Updated: June 29, 2016 03:01 IST2016-06-29T03:01:21+5:302016-06-29T03:01:21+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना-भाजपामध्ये रंगलेले श्रेयाचे युद्ध आता युतीधर्म पाळण्याचा सल्ला देण्याच्या पातळीवर पोचले आहे.

Now the Mahabharata from the United States! | आता महाभारत युतीधर्मावरून!

आता महाभारत युतीधर्मावरून!

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- ठाकुर्ली उड्डाणपुलाचा फक्त प्रस्ताव मंजूर करण्यावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना-भाजपामध्ये रंगलेले श्रेयाचे युद्ध आता युतीधर्म पाळण्याचा सल्ला देण्याच्या पातळीवर पोचले आहे. आम्ही युतीधर्म पाळत होर्डिंगवर भाजपाचे नाव तरी घेतले, पण भाजपाने कुरघोडी करताना तेवढाही युतीधर्म पाळला नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे; तर आमच्या एकाही नेत्याचा फोटो होर्डिंगवर नसल्याने जनतेला पूर्णसत्य सांगण्यासाठी आम्हाला होर्डिंग लावावी लागली, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
मुंबईत शकुनीमामाचा वाद पेटलेला असतानाच कल्याण-डोंबिवलीत मात्र युतीधर्म पाळण्याच्या महाभारताचे वादळ घोंगावत होते.
दोन्ही पक्षातील श्रेयाच्या चढाओढीची होर्डिंग शहरभर लागल्याची दखल घेत ‘लोकमत’ ने ‘सेना-भाजपमध्ये ‘शोले’ चा शो’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची प्रचंड चर्चा रंगली आणि दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांनी ‘शोले’ चा ‘शो’ वरुन आपसातील कुरबूर चव्हाट्यावर आणली. शिवसेनेचे नगरसेवक, महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोेरे म्हणाले, निदान आम्ही युतीचा धर्म पाळत होर्डिंगमध्ये भाजपाचे नाव तरी घेतले, भाजपने ते ही घेतले नाही. म्हणजे आम्ही युतीचा धर्म पाळला.
त्याला प्रत्त्युत्तर देताना भाजपच्या पश्चिम मंडलाचे अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे म्हणाले, आधी बोर्ड शिवसनेनेच लावला, त्यात केवळ भाजपचे नाव घेतले. पण एकाही होर्डिंगमध्ये भाजपच्या नेत्याचा फोटो किंवा उल्लेख नव्हता. त्यामुळे भाजपने शिवसेनेची चूक सुधारत जनतेला पूर्णसत्य सांगण्यासाठी होर्डिंग लावले. त्यात चुकले कुठे? शिवसेनेनेच होर्डिंग लावतांना काळजी घेतली असती तर भाजपावर ही वेळच आली नसती. शिवसेनेने केवळ देखाव्यासाठी युतीचा धर्म पाळला का? असा टोलाही त्यांनी लगावला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत आणि सोशल मीडियावरही याच कुरघोडीची चर्चा सुरू आहे.

Web Title: Now the Mahabharata from the United States!