शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आता लोणीकर दुसऱ्या पत्नीमुळे अडचणीत!

By admin | Updated: June 13, 2015 02:30 IST

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच त्यांनी दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती निवडणूक

मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच त्यांनी दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने आज केला. लोणीकर यांना मंदाकिनी आणि वंदना अशा दोन पत्नी आहेत. दोघींच्या मतदार ओळखपत्रावर बबनरावांचे नाव आहे. मात्र, आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी केवळ मंदाकिनी यांचेच नाव नमूद केले. वंदना यांचा उल्लेखच नाही. दुसऱ्या पत्नीचे नाव निवडणूक आयोगापासून लपविण्याचे काय कारण, असा सवाल करत या बाबत लोणीकर यांनीच खुलासा करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. २२ मे रोजी लोणीकर यांनी तुळजापूरच्या मंदिरात सपत्नीक दर्शन घेतले तेव्हा वंदना या त्यांच्यासोबत होत्या, अशी माहिती सावंत यांनी दिली. काँग्रेसने केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोणीकर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीएसच्या पूर्वपरीक्षेसाठी किंवा बीए परीक्षेसाठी कधीही प्रवेश घेतला नव्हता, असा खुलासा परतूर येथील लालबहादूर शास्री महाविद्यालयाने केला असल्याचे सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)