शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

"आता गडकरींनाही सांगणार...!"; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:40 IST

"घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर, काही नेत्यांकडून, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यातच आता, "घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर आपण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही, तुम्ही त्या छोट्या, खासगी विमानाने प्रवास टाळायला हवा, असे सांगणार आहोत, असेही देमुख यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

देशमुख म्हणाले, "अजित पवार यांचा विमान अपघातात जो दुर्दैवी मृत्यू झाला, यासंदर्भात अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित दादांच्या पक्षाचे जे जेष्ठ नेते आहेत. माननीय छगनजी भुजबळ असोत किंवा दादांच्याच पक्षाचे काही आमदार असोत. बाहेरच्यांनीही शंका व्यक्त केली आहे की, हा अजितदादाचा अपघात आहे की घातपात आहे? कारण अनेकांना शंका आहे कि, जेव्हा हा अपघात झाला त्या वेळी  नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले की बारामतीच्या एअरपोर्टवर व्हिजिबिलीटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल. पण असं आहे कि व्हिडिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टवर आलं, तेव्हा आपणही बघितले असेल की, अनेकांनी त्या विमानाचा व्हिडिओ घेतला आणि दोन किलोमिटरवरूनही त्या विमानाचा व्हिडिओ अगदी स्पष्ट आला. जर धुकं असतं तर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर एवढ्या दुरून तो व्हिडिओ आला नसता आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतंय की, हा घातपात आहे का? यामुळे सर्व चिंतित आहेत की, वस्तुस्थिती समोर यायला हवी. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझंसुद्धा समर्थन आहे." "आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमाने तर होईल, पण त्यांच्यावर हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखाली व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहेत? काय घडलं? काय नाही? घातपात आहे? की अपघात आहे? हे सर्व जनतेसमोर येईल, असेही देशमुख म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेत काय म्हणाले देशमुख? -अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असे संजय राऊत बोललेत, असे वाटते तुम्हाला? असे विचारले असता, "आता त्यांना शंका आहे म्हणून संजय राऊत बोलले. मी धेखील काही माध्यमांना बोललो की, माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला विमानतळावर वैगेरे भेटले तर, मी त्यांना नक्की सांगेन की तुम्हीसुद्धा त्या छोट्या, जी खासगी विमानं आहेत, त्यांनी तुमचा प्रवास टाळायला हवा," असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Deshmukh demands inquiry into Ajit Pawar's death, warns Gadkari about private planes.

Web Summary : Anil Deshmukh seeks a High Court-monitored inquiry into Ajit Pawar's death, suspecting foul play. He also plans to advise Nitin Gadkari to avoid private planes for travel, citing safety concerns following the accident.
टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAjit Pawarअजित पवारNitin Gadkariनितीन गडकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAccidentअपघात