शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आता फेसबुकवरही करा तक्रारी!

By admin | Updated: August 28, 2014 03:13 IST

पोलीस दलाचे सक्षमीकरण करतानाच आधुनकीकरणावरही भर देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आता स्वत:चे फेसबुक पेज तयार केले

मुंबई : पोलीस दलाचे सक्षमीकरण करतानाच आधुनकीकरणावरही भर देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आता स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे. प्रवाशांना काही तक्रारी, सूचना असल्यास ते या पेजवर नोंदवू शकणार आहेत. त्याची त्वरित दखल घेऊन त्यावर कारवाई केली जाईल, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वे पोलीस अधिक बळकट करतानाच त्यात काही बदल करण्यात येत असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त (लोहमार्ग) रवींद्र सिंगल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.मुंबई रेल्वे पोलिसांची वेबसाइट त्याचबरोबर हरवलेल्या व्यक्तींकरिता शोध वेबसाइटची माहिती सांगतानाच त्यात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. हरवलेल्या तसेच लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, पण ओळख न पटणाऱ्यांची माहिती तसेच फोटो शोध वेबसाइटवर टाकले जातात. या वेबसाइटमध्येही बदल करण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले. तसेच रेल्वे पोलिसांची वेबसाइटही आकर्षित करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये आणखी एक पाऊल टाकतानाच रेल्वे पोलिसांचे फेसबुक पेज सुरू करण्यात आले असून, त्यावर तक्रारी आणि सूचना नोंदवू शकतात. त्याची त्वरित दखल घेण्यात येईल आणि त्यावर कार्यवाही केली जाईल, असे सिंगल म्हणाले. या फेसबुक पेजवर फोटो आणि व्हिडीओही डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. एखादा गुन्ह्याचा किंवा आरोपीचा फोटो यावर टाकू शकता. ही वेबसाइट बुधवारपासून केल्याचेही ते म्हणाले. एनएसएसही राहणार तैनातप्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सूचना आणि तक्रारी ऐकण्यासाठी प्रत्येक स्थानकावर एनएसएसचे दोन जण तैनात केले जाणार आहेत. यासाठी एनएसएससोबत दोन बैठकाही झाल्या असल्याचे सिंगल यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर प्रत्येक स्थानकावर एनएसएसचे जवान तैनात केले जाणार आहेत. गर्दीच्या वेळेत हे तैनात असतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)