शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हास्तरावर हज समिती

By admin | Updated: August 14, 2014 23:47 IST

जिल्हास्तरावर हज समिती राज्य हज समितीशी समन्वय ठेवणार.

अमोल जायभाये / खामगावराज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील हज यात्रेकरूंशी समन्वय व संपर्क साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज समिती स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य हज समिती ही सल्लागार स्वरुपाची असून, ती केंद्रीय हज समिती आणि राज्यातील हज यात्रेकरुमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य हज समितीशी समन्वय साधण्यासाठी जिल्हा स्तरावर हज समितीची स्थापना करण्यात येणार आहे. हज समिती स्थापन केल्यानंतर ती स्वतंत्रपणे काम करुन राज्य हज समितीला माहिती देईल. या समितीसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत दिली जाणार नाही. या समितीमध्ये एकूण ११ सदस्य राहणार आहेत. समितीचे सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची निवड करतील. समितीच्या सदस्यांमध्ये हज यात्रेचा अनुभव असलेल्या एका सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील किमान २ महिला व २ पुरुष समितीमध्ये राहणार आहेत. या हज यात्रेसाठी स्वेच्छेने मदत करणार्‍या जिल्ह्यातील सेवाभावी, धार्मिक संस्थाचे २ प्रतिनिधीही समितीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीच्या स्थापनेमुळे जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांना हज यात्रेसाठी जाणे सुखकर होणार आहे. *जिल्हास्तरीय हज समितीने राज्यातील समितीकडून मिळालेल्या माहितीचे व आदेशाचे पालन करुन तसे काम करणे अपेक्षित आहे. समितीची स्थापने मागे जिल्ह्यातील हज यात्रेकरुंची सोय व्हावी, हा उद्देश आहे.* समितीला कोणत्याही कामासाठी निधी जमा करायचा असेल, तर त्यासाठी राज्य समितीची परवानगी घ्यावी लागेल. जिल्हास्तरीय हज समितीचे गठण झाल्यानंतर, समितीचा कार्यकाळ ३ वर्षाचा राहील. कार्यकाळ संपल्यानंतर समित्यांचे पुर्नगठण करण्याबाबत राज्य हज समितीकडून शासनास शिफारस करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा समिती गठित करण्यात येईल. हज यात्रेकरुंना सुरक्षित व सोयीस्कर यात्रा करता यावी, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.*यात्रेकरुंच्या आरोग्याची काळजी म्हणून लस टोचणी, तसेच शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व यात्रेकरुं ची तपशीलवार माहिती राज्य हज समितीकडे पाठवण्याची जबाबदारी समितीची राहणार आहे.*जिल्ह्यातील यात्रेकरुंना वेगवेगळ्य़ा संस्थांकडून आर्थिक वा तत्सम स्वरुपाची मदत मिळवून देण्याचे काम समितीला करावे लागणार आहे. यात्रेकरुंचे प्रशिक्षणही या समितीच्या माध्यमातूनच राबविण्यात येईल.