महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 16:51 IST2020-01-21T16:50:40+5:302020-01-21T16:51:31+5:30
ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणिं ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. तर या बंदच्या पार्श्वभूमीवर आंबडेकर यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात म्हंटले आहे की, 24 जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदला ज्या-ज्या संघटनांनी पाठींबा दिला आहे. अशा सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची जिल्हा, तालुका पातळीवर वंचित बहुजन आघाडीकडून बैठक बोलवण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील,तालुक्यातील कामगार संघटनांची बैठक घेऊन त्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करावी. तसेच ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात किंवा परिसरात असलेल्या एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखानदाराच्या भेटी घेऊन त्यांना 24 तारखेला बंद पाळण्याची विनंती करण्यात यावी असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.