शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जास्त काहीच नाही; आमचे काम परत द्या!

By admin | Updated: December 17, 2014 00:29 IST

आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच

कामगारांची मागणी : १५ महिलांचे आमरण तर ६० पुरुषांचे साखळी उपोषण सुरूगणेश खवसे - नागपूर आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे चित्र सध्या पटवर्धन मैदानात दिसून येते. तेथे गेल्या नऊ दिवसांपासून १५ महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत त्यांच्याकडे कुणीही फिरकले नाही. सोबत आणलेले आणि खिशात होते ते पैसेही संपले. आता पुरुषांच्या खाण्याचेही ‘वांधे’ झाले आहेत. येथून जागा सोडली तर मागण्या पूर्ण होणार नाही अन्् येथे थांबतो म्हटले तर उपाशीच थांबावे लागणार... करावे तर काय, अशा पेचात अन्यायग्रस्त कामगार सापडले आहेत. ‘आम्हाला आमचे काम परत द्या’ अशी मागणी त्यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पेंच पाटबंधारेच्या कांद्री उपविभागात पाणी वाटप करण्याचे काम करणाऱ्या कामगारांना २००१ मध्ये कामावरून कमी करण्यात आले. कामावर परत घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगारांनी जनसमस्या अन्यायग्रस्त समिती संघटनेच्या छताखाली साखळी आणि महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. पवनी तालुक्यातील कांद्री (जि. भंडारा) येथे पेंच पाटबंधारे उपविभागात सुमारे हजार कामगार कामावर होते. कालव्यातून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात पाणी सोडण्याचे काम त्यांच्याकडे होते. काम सुरू असताना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ या कामगार कुटुंबीयांवर आली. याबाबत बरेचदा निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. ‘जास्त काहीच नको; आम्हाला आमचे काम द्या’ अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, ज्या कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, त्याच्या पत्नीला पेन्शन लागू करावी, प्रत्येक कामगार कुटुंबाला बी.पी.एल. कार्ड देण्यात यावे आदी मागण्यांसाठी या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये मैना मुटकुरे, लता झंजाळ, मंजू सवालाखे, रेखा मसरने, सुनीता सवालाखे, समता बशिने, फुलवंता सवालाखे, लता माटे, अनंदा निंबार्ते, शीला हारगुडे, गोपिका भुते, मीरा भोयर, बेबी पुरोहित, विमला भोयर यांचा समावेश आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. यापैकी लता झंजाळ या महिलेची तीन दिवसांपूर्वी प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिला पोलिसांनी लगेच मेडिकलमध्ये भरती केले. तेथे उपचार केल्यानंतर तिने पुन्हा उपोषण सुरू केले. या महिलांसोबतच नानाजी कुथे, सीताराम झंजाळ, चंद्रशेखर मानकर, धरमराम गऱ्हाडे, गजानन बावणे, विठ्ठल मते, प्रमोद घरजाले, ज्ञानेश्वर वैद्य, शेखर झंजाळ, अमर निंबार्ते, देवसिंग नागपुरे, जयदेव झंजाळ, भालचंद्र खरवडे, सहादेव माटे, चंद्रभान झंजाळ, गणेश मसरके, विजय सवालाखे, रामचंद्र पिल्लारे यांच्यासह इतर पुरुष साखळी उपोषण करीत आहेत. आता पुरुषही आमरण उपोषणाच्या पावित्र्यातपवनी तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातून हे कामगार आंदोलनस्थळी आले आहेत. त्यांनी येताना थोडेबहुत पैसे आणले होते. पाच-सहा दिवस पैसे पुरले. चहा-नाश्ता कसातरी भागला. येतानाच तांदळाचा एक कट्टा आणला होता. मात्र तो किती दिवस पुरणार. आता खिशात पैसे नाही अन् तांदूळही संपले. एवढेच काय तर चहा पिण्याकरिता पैसे नाही. गावाला परत जाण्याचाही प्रश्नच आहे. मागणी पूर्ण झालेली नाही. अशात पैशाची जुळवाजुळव करतो म्हटले तर जागा सोडावी लागणार. जागा सोडली तर आंदोलन संपले असे वाटेल. दुसरीकडे जागा सोडली नाही तर पोटात अन्न जाणार नाही. अशा पेचात कामगार सापडले आहेत. मात्र पोटातली भूक पोटातच ठेवून आता महिलांसोबत आपणही आमरण उपोषण सुरू करू, असा निर्धार कामगारांनी केला आहे.