शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

देशाला स्मार्ट सिटी नव्हे, स्मार्ट व्हिलेजची गरज!

By admin | Updated: February 3, 2015 17:29 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़

पारनेर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़गोविंदाचार्य यांनी यादवबाबा मंदिर, नापासांची शाळा, मीडिया सेंटर, पद्मावती परिसर आणि पाणलोट क्षेत्र विकासाविषयी माहिती घेतल्यानंतर दुपारी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली़ लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे व काळ्या पैशासंबंधी कार्यवाही या तीन मुद्द्यांवर हजारे यांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.बैठकीत लोकपाल, भूमी अधिग्रहण, काळा पैसा आणि ग्रामविकास यासंबंधी चर्चा झाली. ग्रामविकासाच्या मुद्द्यावर गोविंदाचार्य यांनी हजारे यांच्याशी सहमती दर्शवत गांधीजींच्या विचारानेच खरा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी फुगणारी शहरे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले़ केंद्र सरकारने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून स्मार्ट व्हिलेजची योजना राबवायला हवी, अशी सूचना त्यांनी मांडली़ सुमारे ९ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही केंद्र सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या हिताचे दिसत नाही, अशी टीका करीत त्यासाठी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून देशभरात नव्याने संघटन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गोविंदाचार्य यांच्यासोबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बिस्ट उपस्थित होते. बैठकीनंतर दोघांनी युरोपमधून आलेल्या ४० महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मोदी सरकार, भारतासमोरील आव्हाने, भ्रष्टाचारविरोधी चळवळ, तरुणांना प्रेरणा इत्यादी मुद्द्यांवर अण्णांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)