शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

हेही ‘सात्विक’ नाही !

By admin | Updated: December 5, 2014 00:45 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

सात्त्विक इन्व्हेस्टमेंटच्या संचालकावर गुन्हे दाखल नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमोल ढाके, प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वच्या सर्वच नागपुरातून पळून गेलेले आहेत.अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये अमरावती रोडवर पुराणिक ले-आऊट (भरतनगर) मध्ये सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. आकर्षक व्याज देणाऱ्या अनेक योजनांचे मृगजळ दाखवून ठेवीदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे ढाके आमिष दाखवत होता. तिमाही, सहामाही आणि बारामाही योजनांसोबतच ४२ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचेही तो आमिष दाखवत होता. त्याच्या या गोरखधंद्यात प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी यांचाही सहभाग होता. ते सुद्धा ठेवीदारांना रक्कम गुंतविण्यासाठी प्रवृत्त करीत होते. या सर्वांनी मिळून शेकडो ठेवीदारांकडून वेगवेगळ्या मुदतीच्या कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. गेल्या वर्षभरात अनेक ठेवीदारांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे ठेवीदार आपली रक्कम घेण्यासाठी सात्त्विकच्या कार्यालयात जाऊ लागले. या ठेवीदारांना अमोल ढाके आणि त्याचे साथीदार वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवीत होते. पोलिसांकडे तक्रारकर्त्यांची गर्दीढाके आणि साथीदारांनी काशीकर तसेच अन्य १६ तक्रारदारांची फसवणूक केल्याचा जो गुन्हा दाखल झाला, त्यात फसवणुकीची रक्कम ३३ लाख, १४ हजार रुपये आहे. प्रत्यक्षात हा आकडा अनेकपट अधिक आहे. कारण ढाके आणि कंपनीवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती कर्णोपकर्णी मिळाल्याने तक्रारकर्त्यांची अंबाझरी ठाण्यात गर्दी वाढली आहे. ३० ते ४० जण आपलीही फसवणूक झाल्याचे आज पोलिसांना सांगत होते. या सर्वांना रितसर तक्रार करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. नऊ वर्षात १०० कोटी? अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये सात्विक कंपनी सुरू केली. एप्रिल २०१४ पर्यंत अर्थात नऊ वर्षात त्याने १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. ठेवीदारांची रक्कम परत करण्याची मुदत पूर्ण होताच त्याने भरतनगरातील गाशा गुंडाळला आणि पसार झाला. अलीकडे तो ठेवीदारांसोबत फोनवरही बोलत नव्हता. गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत. येत्या २४ तासात पीडित ठेवीदारांची संख्या तसेच ढाके आणि कंपनीने हडपलेल्या रकमेचा आकडाही वाढणार आहे. त्यामुळे हा तपास गुन्हेशाखेकडे सोपविला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगताहेत.