"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"

By प्रविण मरगळे | Updated: April 8, 2025 13:13 IST2025-04-08T12:27:27+5:302025-04-08T13:13:12+5:30

तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय अशी टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे.

North Bharatiya Vikas Sena President Sunil Shukla has warned MNS President Raj Thackeray and criticized him for being anti-Hindu | "...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"

"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"

मुंबई - आरएसएस, बजरंग दलात ९० टक्के उत्तर भारतीय कार्यकर्ते आहेत. उद्या जर महाराष्ट्रात गजवा ए हिंद झालं तर मराठी लोकांना वाचवणार कोण?, राज ठाकरे तुम्ही हिंदूविरोधी आहात. आम्ही सनातनी पक्ष म्हणून सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभं करू असा इशारा उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिला आहे.

सुनील शुक्ला यांनी मनसे पक्षाची मान्यता रद्द करत राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. सुनील शुक्ला म्हणाले की, RSS, बजरंग दलात ९० टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या कानफाडीत तुम्ही मारताय. उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे हे कसलं राजकारण...आम्ही तुमचा विरोध करतो, सुप्रीम कोर्टात तुमच्याविरोधात आदेश आणणारच आहे. सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभं करणार असं त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय?

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी न येणाऱ्यांना मारा असा आदेश दिला. त्यानंतर सर्व मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मराठी भाषा येत नाही त्यांना मारले जाते. सिक्युरिटी गार्ड असो वा बँकेत काम करणारा कर्मचारी याला मारहाण होते. भाषेचा आम्ही आदर करतो पण भाषेच्या नावाखाली तुम्ही कोणाला मारू शकत नाही. तुम्ही सर्वात मोठा गुन्हा हिंदूंना मारून करताय. तुम्ही पंक्चरवाल्याला मारत नाही जे १०० टक्के मुस्लीम आहेत. चावी बनवणाऱ्यांना मारत नाही जे मुसलमान आहेत. मटण-चिकन दुकानदारांना मारत नाही जे पूर्ण मुसलमान आहेत मात्र तुम्ही उत्तर भारतीय जो ब्राह्मण, क्षत्रिय असेल त्यांना मारहाण करत आहात. तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात असं सुनील शुक्ला यांनी म्हटलं.

दरम्यान, जर महाराष्ट्रात भविष्यात कुठेही गजवा ए हिंद झालं तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा राहयला हवा की नको? तुम्ही उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचं विभाजन करत आहात. हिंदूंना कृपा करून विभाजित करू नका. उत्तर भारतीय विकास सेना हा राजकीय पक्ष असून आम्ही उघडपणे सनातनी पक्ष असल्याचं सांगतो. जर तुम्ही हिंदूंविरोधात अशी भूमिका घेत असाल तर आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचं उल्लंघन करत आहात. तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा नाही. तुम्ही केवळ उत्तर भारतीय नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात असा आरोप सुनील शुक्ला यांनी केला. 

Web Title: North Bharatiya Vikas Sena President Sunil Shukla has warned MNS President Raj Thackeray and criticized him for being anti-Hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.