शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या गावातच नाही एसटी बस

By admin | Updated: July 5, 2017 02:46 IST

राहू ते दौंड एसटीसेवा सुरु करण्याची राहूबेटवासीयांची मागणी कागदावरच राहिल्याने दौंड एसटी सेवेच्या कामकाजाबाबत प्रवासी वर्गामधून

लोकमत न्यूज नेटवर्कराहू : राहू ते दौंड एसटीसेवा सुरु करण्याची राहूबेटवासीयांची मागणी कागदावरच राहिल्याने दौंड एसटी सेवेच्या कामकाजाबाबत प्रवासी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, राहू हे आमदार राहुल कुल यांचे गाव आहे. एसटीसेवा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राहू ते दौंड अंतर ६५ किलोमीटरच्या जवळपास असून या राहूपासून बेटातील बहुतेश गावे ही दहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत. बेट परिसरातील ग्रामस्थांना दौंड शहराशी व दौंड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने न्यायालयीन कामकाज तहसील कचेरी, पंचायत समिती, कृषी विभाग कार्यालय ही महत्त्वाची कार्यालयीन कामकाज करण्यासाठी राहूबेट परिसरातील ग्रामस्थांना पर्यायी वाहनाचा आधार घ्यावा लागत असतो. वाहने वेळेवर न भेटल्याने शासकीय कामे वेळेवर होत नसल्याने विनाकारण वेळ आणि खर्च वाया जातो. राहू वरुन सकाळी साडेआठ वाजता तर दौंडवरुन राहू मुक्कामी येणारी एसटी बस ही ६ वाजता दौंड डेपोवरुन सोडण्यात यावी अशी मागणी पसिरातील ग्रामस्थांची आहे. त्यात परिसरात शैक्षणिक सुविधा नसल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना खुटबाव, केडगाव, बारामती याठिकाणी जावे लागत आहे. एसटी सेवा तात्काळ सुरु करण्याची गरज विद्यार्थी वर्गातून पुढे येत आहे. याबाबत दौंड डेपोचे प्रमुख किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,  दौंड ते राहू या गाडीला उत्पन्न नसल्यामुळे ही गाडी बंद करण्यात आली आहे.  दौंड डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. गाड्या जरी खराब असल्या तरी त्या दुरुस्त करुन प्रवाशांना सेवा देण्यासाठी आणि नेहमीच प्रयत्न करत असतो. कर्मचाऱ्यांचा अभाव : डेपोत नादुरुस्त बसच जास्तदौंड एसटी डेपोच्या वापरात ३0 एसटी बस असल्याचे समजते, त्यापैकी काही एसटी बस या नादुरुस्त झाल्याने वर्कशॉपमध्येच असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, तर कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काही एसटी गाड्या रद्द कराव्या लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु, त्या जागेवर अद्याप कर्मचारी भरले नाहीत. बहुतेक वेळा एसटी नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावरच प्रवाशांना पर्यायी वाहने शोधून प्रवास करावा लागल्याने त्यांचा वेळ आणि खर्च वाया जातो.