शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पवार यांचे नाव घेतल्याशिवाय कोणत्याच नेत्याला मोठेपणा मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 8:39 PM

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा महसुलमंत्र्यांना टोला

ठळक मुद्दे- राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सोलापूर दौºयावर- दुष्काळी भागांची पाहणी बरोबरच शेतकºयांशी साधला संवाद- दुष्काळावरून सत्ताधारी भाजप सरकारवर केली जोरदार टीका

सांगोला : शरद पवार यांचा पॉवरच इतका आहे की, राज्यात असेल किंवा देशात असेल त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणालाही मोठेपणा मिळत नाही, असा टोला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगोल्यात लगावला.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलदुष्काळी दौºयावर असताना दुष्काळाविषयी न बोलता पवार कुटुंबीयांवर टीका करतात, याविषयी वाघ यांना विचारले असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, शरद पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे़ या राज्याला पूर्णवेळ कृषी मंत्री नाही ना सचिव नाही, जो अन्नदाता आहे, त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारला पूर्णवेळ मंत्री देता आला नाही. यावरून सरकारची मानसिकता काय आहे हे कळते, अशी खोचक टीका त्यांनी केली.

 आघाडी सरकारच्या काळात आॅगस्ट महिन्यात छावण्या सुरू केल्या होत्या; मात्र राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला शेतकरी, कामगार, कष्टकºयांच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नाही. उलट भाजप सरकार विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. छावण्या सुरू होऊन एक महिना झाला तरीही छावणीचालकांना अनुदान मिळाले नाही. छावण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, याचा अर्थ त्यांचा लोकांवर विश्वास राहिलेला नाही.

तरंगेवाडी छावणीत विजेची सोय नाही, खड्ड्यातील गढूळ पाणी जनावरांना व माणसांना प्यावे लागते, ही बिकट अवस्था आहे. अर्धा किलो पशुखाद्य जनावरांसाठी पुरेसे नाही ते वाढवून द्यावे, अशी पशुपालकांची मागणी आहे. शेळ्या-मेढ्यांना जगवण्यासाठी अनुदान मिळावे ही प्रामुख्याने महिलांची मागणी आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळChitra Waghचित्रा वाघchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा