शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

प्रकृती न सुधारल्याने 'त्या' विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार, 500 उठाबशांचं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 1:51 PM

500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात येत आहे.  प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तिला मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून आता मुलीवर पुढील उपचार मुंबईच्या केईएम रूग्णालयात होणार आहेत. 

कोल्हापूर:  500 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचा सर्व वैद्यकिय खर्च महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्यामुळे या मुलीवरील सर्व वैद्यकिय चाचण्या आता मुंबईत होणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून आता मुलीवर पुढील उपचार मुंबईच्या केईएम रूग्णालयात होणार आहेत. यापूर्वी आज विधानसभेत चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांच्यावर कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी केली होती.

सीपीआर रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. 11) सायंकाळी उपचारासाठी या मुलीला आणण्यात आले. याठिकाणी तिचे सी.टी.स्कॅन, एमआरआय आणि सर्व शारिरीक तपासण्या करण्यात आल्या. पण, काही निदान झाले नाही. त्यामुळे न्युरो फिजिथेरपीस्ट डॉ. औरंगाबादकर यांनीही तपासणी केली. पण, कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दूपारी तिला रुग्णवाहिकेमधून मुंबईला नेण्यात आले. विजया चौगुले यांच्यासमवेत तिची आजी पार्वती चौगुले, वडिल निवृत्ती चौगुले व नातेवाईक गेले आहेत.भोतोलीतील या मुलीला गृहपाठाच्या वही घरी विसरली म्हणून संशयित शिक्षिका अश्विनी देवण यांनी 500 उठाबशा काढण्याची शिक्षा 24 नोव्हेंबरला कानूर येथे शाळेत दिली. विजयाने कशातरी 300 उठाबशा काढल्या. पण, त्यानंतर तिची प्रकृति बिघडली. प्रथम तिच्यावर गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सीपीआर रुग्णालयाकडे उपचारासाठी आणण्यात आले होते.विजया चौगुले या मुलीचे निदान स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्यावर ‘व्हीडीओ-ईईजी’नुसार अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकिय चाचण्या केईएम रुग्णालयामध्ये होणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बोलणे झाले आहे.-डॉ. जयप्रकाश रामानंद,प्रभारी अधिष्ठाता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी