शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 14:35 IST

विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल मनसेत दूमत

मुंबई: विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल मनसेत दूमत असल्याचं समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीविषयी त्यांची मतं व्यक्त केली. लवकरच राज ठाकरे निवडणुकीबद्दलची मनसेची भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र राज ठाकरेंनी भाजपाविरोधात जोरदार प्रचार केला होता. मोदी-शहांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन दूर करा, असं आवाहन करत राज यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या. त्यामुळेच राज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज कृष्णकुंजवर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये काही नेत्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. तर काहींनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक लढवू नये, असा सूर आळवला.लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकदेखील न लढवल्यास कार्यकर्ते, मतदार पक्षापासून दूर जातील, असं मत काही नेत्यांनी राज यांच्याकडे व्यक्त केलं. पक्षानं निवडणूक लढवल्यास लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असं काही नेत्यांनी राज यांनी सांगितलं. तर राज्यातील सध्याची स्थिती, भाजपा-शिवसेनेत होणारं जोरदार इनकमिंग पाहता निवडणूक लढवून पैसा वाया का घालवायचा, अशी भावना काहींनी व्यक्त केली. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे