शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नऊ माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात

By admin | Updated: October 9, 2014 04:30 IST

विधानसभेच्या रणसंग्रामात अनेक दिग्गज उतरले आहेत. यामध्ये ज्यांनी खासदारकी भोगली, असेही काही उमेदवार आहेत.

डॉ. किरण वाघमारे ल्ल अकोला विधानसभेच्या रणसंग्रामात अनेक दिग्गज उतरले आहेत. यामध्ये ज्यांनी खासदारकी भोगली, असेही काही उमेदवार आहेत. राज्यातील ९ माजी खासदार आमदार होण्याच्या तयारीने मैदानात उतरले असून, हे माजी खासदार विजयी झाले तर त्यांना लोकसभेसोबतच विधानसभेतही काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. लोकसभा हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. लोकसभेत संपूर्ण देशाचे प्रतिबिंब अनुभवण्यास मिळते. त्यामुळे या सभागृहात जाण्यासाठी मोठी चढाओढ असते; मात्र दिल्लीचे अनुभव घेऊन, पुन्हा महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही कमी नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ९ माजी खासदार आपले भाग्य आजमावत आहेत. त्यापैकी काहींना अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. जे माजी खासदार विधानसभा निवडणूक लढवित आहेत, त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ उमेदवार काँग्रेसचे आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीचे ३, तर भाजपचे २ आहेत.यात वर्धा जिल्ह्यातील देवळी येथून सुरेश वाघमारे (भाजप), जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून हरिभाऊ जावळे (भाजप), नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून सुबोध मोहिते (काँग्रेस), धुळे जिल्ह्यातील नवापूर येथून स्वरूपसिंग नाईक (काँग्रेस), परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून सुरेश वरपुडकर (काँग्रेस), हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून अ‍ॅड. शिवाजी माने (राष्ट्रवादी काँग्रेस), सांगली येथून मदन पाटील (काँग्रेस), बारामती येथून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी) तर नाशिक पूर्वमधून देवीदास पिंगळे (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.