निलेश राणेंचे ‘डीपीडीसी’ सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: July 22, 2014 01:53 IST2014-07-22T01:53:51+5:302014-07-22T01:53:51+5:30

माजी खासदार निलेश राणो यांचे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीतील (डीपीडीसी) सदस्यत्व सोमवारी रद्द करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय सोमवारीच जारी करण्यात आला.

Nilesh Raneke's DPDC membership canceled | निलेश राणेंचे ‘डीपीडीसी’ सदस्यत्व रद्द

निलेश राणेंचे ‘डीपीडीसी’ सदस्यत्व रद्द

मुंबई : माजी खासदार निलेश राणो यांचे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीतील (डीपीडीसी) सदस्यत्व सोमवारी रद्द करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय सोमवारीच जारी करण्यात आला.
नारायण राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला, त्याच दिवशी त्यांच्या मुलाचे ‘डीपीडीसी’वरील सभासदत्व रद्द करण्यात येत असल्याचा जीआर काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निलेश नाममिर्देशित सदस्य होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने ‘डीपीडीसी’तील त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला. एखादा खासदार पराभूत झाल्यानंतर सभासदत्व आपोआप रद्द होते, असे अतानाही त्यासाठी जीआर काढला.
 

 

Web Title: Nilesh Raneke's DPDC membership canceled