शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सबलीकरणासाठी पुढचे पाऊल

By admin | Updated: December 2, 2014 08:51 IST

असीम कर्तृत्वाचे पंख लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी

पुणे : असीम कर्तृत्वाचे पंख लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूह’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट २०१४’ या राष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वाचे उद्घाटन आज (मंगळवारी) होणार आहे. रिपब्लिक आॅफ युगांडाच्या उच्चायुक्त एलिझाबेथ पायलो नापेयोक, केनियाच्या उच्चायुक्त फ्लॉरेन्स इमिसा वेचे, प्रख्यात अभिनेत्री लिसा रे व यूएसके फाउंडेशनच्या संचालिका उषा काकडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असणार आहेत. नगर रस्त्यावरील हॉटेल हयात येथे सकाळी १० ते ६ या वेळेत ही परिषद पार पडणार आहे.‘सारे आकाश तुमचे...’ ही चौथ्या राष्ट्रीय परिषदेची संकल्पना आहे. महिलांनी पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रांत आश्वासक पाऊल टाकले. पण संसाराचे सर्वाधिक ओझे महिलांनाच वाहावे लागते. बदलत्या पुरुषी मानसिकतेतून हे ओझे काहीसे कमी झाले असले, तरी त्यांना संसार आणि नोकरीत मेळ घालताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या आव्हानांचा वेध घेण्याचा प्रयत्न या परिषदेत होणार आहे. ‘नोकरदार महिलांसमोरील प्रश्न’ या विषयावर चर्चा होणार आहे.समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांसाठी ‘सारे आकाश मोकळे’ परिषदेची ही संकल्पना असून, यावर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या महिला सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा निमंत्रक आहेत. ‘अ‍ॅक्सिस बँके’च्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस, प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, ‘पेप्सिको’चे (इमर्जिंग मार्केट्स) उपाध्यक्ष व सरव्यवस्थापक सत्यव्रत पेंढारकर, ‘बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या (भारत) कम्युनिकेशन विभागाच्या उपाध्यक्षा अर्चना व्यास, निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण, ‘नेटवर्क १८’च्या असोसिएट फीचर एडिटर रीचा अनिरुद्ध, ‘करी नेशन’च्या संस्थापक संचालिका प्रीती नायर, ‘अस्तित्व’ या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा व ‘एलजीबीटीं’च्या हक्कांसाठी लढणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी, ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर, सामाजिक व राजकीय विश्लेषक अलका शर्मा या परिषदेत सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी हे परिषदेचे सूत्रसंचालन करणार आहेत.