शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे

By admin | Updated: March 18, 2015 01:35 IST

गुजरातमध्ये १३ लाख १८ हजार ५० कोटी रुपयांची तर महाराष्ट्रात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात दिसते.

मुंबई : गेल्या २३ वर्षांमधील औद्योगिक गुंतवणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे असल्याचे दिसते. गुजरातमध्ये १३ लाख १८ हजार ५० कोटी रुपयांची तर महाराष्ट्रात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात दिसते. औद्योगिक गुंतवणुकीचे १८ हजार ७०९ प्रस्ताव १९९१ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्राकडे आले. गुजरातकडे १२ हजार ५८४ प्रस्ताव आले. मात्र, गुंतवणुकीबाबत गुजरातने महाराष्ट्रावर आघाडी घेतली. देशात झालेल्या औद्योगिक गुंतवणुकीत गुजरातचा वाटा १२.२३ टक्के आहे तर महाराष्ट्राचा वाटा आहे, ९.८६ टक्के. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि मॉरिशस हे प्रमुख देश असून, या गुंतवणुकीत अनुक्रमे १४ आणि १३ टक्के वाटा आहे. रद्द एसईझेडने नुकसान : रद्द झालेल्या किंवा मागे घेण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांमुळे (एसईझेड) राज्याचे नुकसान झाले. या एसईझेडद्वारे ४ लाख ६८ हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र एकही रोजगारनिर्मिती झाली नाही. १८ हजार ४०० कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीपैकी एक छदामही गुंतवणूक झाली नाही. उद्योगांना भरीव अनुदान : राज्यातील उद्योगांना गेल्या वर्षी डिसेंबर २०१४पर्यंत १ हजार ७६२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यात विशाल प्रकल्पांना दिलेल्या १ हजार ५३० कोटी रुपयांचा वाटा मोठा आहे. सावकारी कर्जामध्ये वाढ : राज्यात परवानाधारक खासगी सावकारांच्या कर्जाच्या प्रमाणात आधीच्या वर्षीच्या तुलनेत २०१४-१५मध्ये वाढ झाली. २०१३मध्ये ८ लाख ४५ हजार ६९५ जणांवर ६५५ कोटी ६१ लाख रुपये कर्ज होते. २०१४-१५मध्ये ८ लाख ५१ हजार ५६४ जणांवर ७१९ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज होते.