शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता कुटुंबीय स्रेहमेळावा उत्साहात

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

अनोख्या उपक्रमाचे विक्रेत्यांकडून स्वागत : महिलांना भेटवस्तूचे वाटप

सांगली : सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने आयोजित वृत्तपत्र विक्रेता कुटुंबीय स्रेहमेळावा उत्साहात झाला. तिळगूळ वाटप, हळदी-कुंकू व महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले. यानिमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऐकमेकांशी कौटुंबिक नाते अधिक घट्ट झाले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबातील सर्वच घटक या निमित्ताने ऐकमेकांशी जोडले गेले.येथील वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये वृत्तपत्र विक्रेता कुटुंबियांचा स्रेहमेळावा, महिलांना हळदी-कुंकू व भेटवस्तूंचे वाटप असा कार्यक्रम घेण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिन चोपडे यांनी स्वागत केले. संघटक तथा राज्य संघटना संचालक विकास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या व्यवसायामुळे कुटुंबाला वेळ न देणारे विक्रेते कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी व्हावेत, महिलांनाही वेगळ्या कार्यक्रमाचा अनुभव लुटता यावा, महिला वर्गाची ऐकमेकांशी ओळख व्हावी, हे हेतू यामधून साध्य करण्यात येत असल्याचे यावेळी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.आपली मुले उच्चशिक्षित व सुसंस्कृत व्हावीत, यासाठी महिला, भगिनींनी दक्ष रहावे. वृत्तपत्रांमधील विविध सदरे, साप्ताहिके, मासिके अशा सहज उपलब्ध होणाऱ्या माध्यमांमधील माहिती आत्मसात करून मुले व कुटंबाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. मुलांच्यादृष्टीने चांगल्या असणाऱ्या टीव्ही सिरिअल आवर्जून पहाव्यात, असे आवाहन स्मिता गाडेकर यांनी यावेळी केले. रूपाली रासनकर, सुजाता कट्याप्पा, उषा नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते प्रकाश उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली व सुरेश चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या विमल काळोखे यांच्यासह वासंती सूर्यवंशी, त्रिवेणी चोपडे, अश्विनी माळी, प्रियांका बंडगर, अश्विनी नवलाई, माधुरी कोरे, अपर्णा रोडे, साधना घोरपडे, पद्मिनी भोसले यांच्याहस्ते महिलांना हळदी-कुंकू, तिळगूळ व भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांनी ऐकमेकांना तिळगूळ वाटप करीत ओळख करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली आसगावकर यांनी केले. कार्यक्रमास अन्नपूर्णा वसगडेकर, सुजाता कट्याप्पा, स्रेहल पांढरे, अश्विनी गायकवाड, शिल्पा आष्टेकर, योगेश्वरी जाधव, मेघा देसाई, अरुणा कटगी, स्मिता गाडेकर, मनीषा काकडे, विद्या हवालदार, सुजाता शिंंदे, रंजना उन्हाळे, सविता दुधाळ, सौ. जमशेट्टी, आशा सूर्यवंशी, सुनीता साळुंखे, यास्मिन मुजावर, रोहिणी चौगुले, जयश्री गवळी, प्रियांका हवालदार या महिलांसह वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिंधी)